१५० वे मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न.
१५० वे मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न.
मुंबई: सायन, चुनाभट्टी येथील राधास्वामी सत्संग भवनमध्ये 'महाराष्ट्र अँड गुजरात राधास्वामी सत्संग असोसिएशन' मुंबई शाखेच्या वतीने गेल्या सोळा वर्षांपासून दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले जाते. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ (मुखरोग तज्ज्ञ) आणि नेत्ररोगतज्ज्ञ आपली मोफत सेवा देतात. आज या वैद्यकीय शिबिरात १५४ गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे आणि योग्य सल्ला देण्यात आला. गरजू रुग्णांना अशा प्रकारे मोफत मदत करणाऱ्या या शिबिराचे संयोजक राजेंद्र श्रीवास्तव यांचे या जनहिताच्या कार्याबद्दल सुप्रसिद्ध समाजसेवी डॉक्टर डॉ. सचिन सिंह आणि गेल्या दशकापासून मुंबईत डेंग्यु, स्वाइन फ्ल्यू व झिका यांसारख्या आजारांबाबत जनजागृती मोहीम राबवणारे व मुंबई शहर स्वच्छ व सुंदर आणि निरामय राहण्याकारिता तत्पर
सामाजिक चिंतक व शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment