दोन थेंब, निरोगी आयुष्यासाठी....
दोन थेंब, निरोगी आयुष्यासाठी....
गेल्या तीन दशकांपासून ‘बीएमसी स्कूल इज द बेस्ट स्कूल इन मुंबई’ ही मोहीम राबविणारे मुंबई, महाराष्ट्रातील सामाजिक विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव यांनी सर्व मुंबईकरांना आपल्या मुलांना पोलिओ लसीचे दोन थेंब अवश्य पाजण्याचे आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात २२ नोव्हेंबर २०२६ रोजी उपराष्ट्रीय लसीकरण दिन (SNID) अंतर्गत पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे थेंब पाजण्यात येणार आहेत.
रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील सर्व निर्धारित लसीकरण केंद्रे, सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाडी केंद्रे तसेच रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी विशेष लसीकरण बूथ उभारण्यात येणार आहेत.
२३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके घरोघरी जाऊन २२ नोव्हेंबर रोजी लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचू न शकलेल्या बालकांची ओळख पटवून त्यांना पोलिओचे थेंब पाजणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबतच नवी मुंबई, ठाणे आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रांतही याच तारखेला ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
नवजात बालकांपासून ते पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओच्या लसीचे दोन थेंब (Oral Polio Drops) पाजणे आवश्यक आहे. आपल्या मुलाचे नियमित लसीकरण पूर्ण झालेले असले किंवा यापूर्वी पोलिओची लस दिलेली असली, तरीही या मोहिमेदरम्यान त्याला पोलिओचे दोन थेंब पाजणे गरजेचे आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्व लसीकरण केंद्रांवर शासनामार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते.
भारताला २०१४ मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आले असले, तरी शेजारील देशांमध्ये पोलिओ विषाणूचा धोका लक्षात घेता देशातील सामूहिक रोगप्रतिकारशक्ती (Herd Immunity) टिकवून ठेवण्यासाठी आणि कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
Comments
Post a Comment