बीएमसी शाळेच्या माजी विद्यार्थिनीला अमेरिकेत मिळणार शिष्यवृत्ती!
बीएमसी शाळेच्या माजी विद्यार्थिनीला अमेरिकेत मिळणार शिष्यवृत्ती!
मुंबई : अभ्युदय नगर एमपीएस माध्यमिक शाळेची गुणवंत माजी विद्यार्थिनी कु. चाँद परवीन शेख हिने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शिक्षण विभागाचा गौरव वाढवला आहे.सन २०२४ मध्ये तिने दहावीची परीक्षा उत्कृष्ट जिद्द, मेहनत आणि दृढनिश्चयाच्या जोरावर उत्तीर्ण केली होती. आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मजबूत शैक्षणिक पाया हा यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी किती महत्त्वाचा असतो, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.
सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रमांच्या बळावर तिने अमेरिकेतील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ सेंट थॉमस (University of St. Thomas) येथे पदवी शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे. यासोबतच तिला दरवर्षी ६५ लाख रुपयांची प्रतिष्ठित शिष्यवृत्तीही मिळाली आहे.तिचे हे असाधारण यश केवळ तिच्या शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण बीएमसी शिक्षण विभागासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.कु. चाँद परवीन शेख हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बीएमसी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुजाता खरे मॅडम, उपशिक्षणाधिकारी आरती खेर मॅडम, कैलाशचंद्र आर्य सर, विभाग निरीक्षिका अलमास अफरोज मॅडम आणि सुनीता खाडे मॅडम यांनी तिचे अभिनंदन केले असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची नवनवीन शिखरे गाठत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment