आप्पासाहेब यशोदा जगन्नाथ बागल सर तर्फे आभार व धन्यवाद.
आप्पासाहेब यशोदा जगन्नाथ बागल सर तर्फे आभार व धन्यवाद.
मुंबई :घाटकोपर पश्चिम येथील सहकार मित्र सुरेश डावरे महापालिका माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेत काल शनिवार, दिनांक 30 मे 2026 रोजी सहकार मित्र सुरेश डावरे महापालिका माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय सभासद श्री. रमाकांत जाधव सर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक विभाग चे नायगांव मनपा माध्यमिक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आप्पासाहेब यशोदा जगन्नाथ बागल सर यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने संस्थेमध्ये उपस्थित राहून शाल श्रीफळ देऊन त्यांच्या सन्मान केला. याप्रसंगी सन्माननीय संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश डावरे सर आणि सौ.विद्या सुरेश डावरे मॅडम व सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यातआला. त्याबद्दल श्री रमाकांत जाधव व इतर सर्वांचे बागल सर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त आज आपण आपल्या प्रदीर्घ सेवाप्रवासातून अधिकृतपणे निवृत्त होत आहात. अनेक वर्षांच्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि यशस्वी सेवेनंतर आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.
एका छोट्याशा खेडेगावातून सुरू झालेला आपला प्रवास मुंबई महानगरपालिकेपर्यंत पोहोचला. या प्रवासात आपण विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. संचालक म्हणून संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले, तर शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेची ज्योत प्रज्वलित केली.
विद्यार्थ्यांप्रती असलेली आपली तळमळ, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि कार्याप्रती असलेली निष्ठा ही अनेकांसाठी प्रेरणादायी राहील. आपल्या कार्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन घडले आणि संस्थांना नवी दिशा मिळाली.
आज आपण सेवेतून निवृत्त होत असलात तरी आपल्या अनुभवांची, विचारांची आणि मार्गदर्शनाची गरज समाजाला कायम राहणार आहे. पुढील आयुष्य सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, आनंद आणि कुटुंबियांच्या सहवासाने भरलेले जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपल्या उज्ज्वल कार्याला मनःपूर्वक सलाम आणि सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!
Comments
Post a Comment