याची साठी केला अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा! युक्तीप्रमाणे आदर्श मुलुख्याध्यापक श्री. अंबरसिंग मगर सर यांच्या सेवा पूर्ती निमित्त शाळेच्या वतीने आनंददायी निरोप!
याची साठी केला अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा! युक्तीप्रमाणे आदर्श मुलुख्याध्यापक श्री. अंबरसिंग मगर सर यांच्या सेवा पूर्ती निमित्त शाळेच्या वतीने आनंददायी निरोप!
बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातील स गो बर्वेनगर मनपा माध्यमिक शाळा घाटकोपर पश्चिम येथील आदर्श मुख्याध्यापक श्री.अंबरसिंग सुभद्रा सुकदेव मगर सर, दिनांक 31 मे 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होत असल्याने शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या वतीने अविस्मरणीय आणि आनंददायी वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला. शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू असतांना आणि तसेच शालेय शिक्षक कर्मचारी यांना जनगणना, मतदान यादी दुरुस्ती च्या कामात व्यग्र असतांना देखील केवळ श्री अंबरसिंग मगर यांच्यावरील प्रेमाखातर मगर सरांचा सेवा कारकिर्दीतील शेवटचा दिवस असल्याकारणाने सर्व कर्मचारी आज शाळेत उपस्थित होते. सकाळी ठीक 7 वाजता शालेय वेळेनुसार मगर सरांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. ज्या शाळेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले त्या शाळेला नतमस्तक होत शाळेला वंदन केले. आणि मुख्याध्यापक कार्यालयात मोर्चा वळविला. अनेक प्रलंबित कामे हातावेगळी केलीत. सर्व फायली अद्यावत केल्यात आवश्यक पत्रव्यवहार आणि प्रशासकीय कार्य पूर्ण केली. उपस्थित शिक्षक आणि कर्मचारी याची सहविचार सभा घेतली, वार्षिक नियोजन आणि शालेय कृती कार्यक्रम याचा आढावा घेतला.. सर्वांना आपल्याला कामाची जबाबदारी वितरीत करून कामाची पद्धत समजावून सांगितली. तसेच प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून पाठीवर कौतुकाची थाप दिली. भावी आयुष्य आणि शाळेचा लौकिक आणि शिक्षण विभागाची कामगिरी उत्तरोत्तर कशी होईल याबाबत मार्गदर्शन केले. सर्व कर्मचाऱ्यांकडून प्रेमपूर्वक भावनिक निरोप घेतला. अशा या संवेदनशील प्रसंगी अनेकांचे डोळे पाणावले होते. शेवटी जातांना शाळेच्या प्रत्येक वर्गखोली, प्रयोगशाळा, वाचनालय, विविध कक्ष, शालेय इमारत, निरखून पाहत पाहत शाळेला शाळेला शेवटचा साष्टांग दंडवत करून निरोप घेतला.
Comments
Post a Comment