मराठी राजभाषा दिन संपन्न
मराठी राजभाषा दिन संपन्न
मुंबई:आज दिनांक 27/02/2025 रोजी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून बृहन्मुंबई मनपा मराठी माध्यमिक शाळा विभागाच्या वतीने आर एस विभागतील भरूचा रोड मनपा मराठी माध्यमिक शाळा दहिसर येथे उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. माध्यमिक शाळा विभागातील विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी कवितावाचन, गीत गायन व नृत्य सादर केले. विशेष बाब म्हणजे उपशिक्षणाधिकारी मनपा माध्यमिक शाळा सन्मा. आरती खैर मॅडम व निरीक्षक शाळा सन्मा. सुनीता खाडे मॅडम यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कविता वाचन केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम लाजवाब होते. सिद्धार्थ सर आणि प्राजक्ता मॅडम यांच्या स्वरचित कविता भाव ल्या.सागर सरांनी सादर केलेला छत्रपति शिवरायांचा पोवाडा चैतन्यदायी होता.विशेष म्हणजे उपशिक्षणाधिकारी सन्मा.आरती खैर मॅडम आणि विभाग निरीक्षक सन्मा. सुनीता खाडे मॅडम यांनीही मराठी भाषेचे गोडावे गायले.
कार्यक्रमाचे आयोजनाची जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक श्री. काशिपुरी गोसावी सर व सहकारी शिक्षकांनी अतिशय उत्तम रित्या पार पाडली.या प्रसंगी आदर्श मुख्याध्यापक अंबर सिंग मगर सर, गणेश मोरे सर, मारूति शेरकर सर आणि सागर पवार सर उपस्थित होते.
Comments
Post a Comment