*चांगल्या कामाचे कौतुक झालेच पाहिजे*
*चांगल्या कामाचे कौतुक झालेच पाहिजे*
. प्रभाग क्रमांक 15 मधील सर्वं नागरिकांसाठी नवरात्री उत्सव मध्ये जो गरबा आयोजित केला त्याबद्दल DSP फाउंडेशन यांचे मनस्वी आभार.
DSP फाउंडेशन , समाजसेवक उमेश दादा पवार, कार्यक्तृत्वान नगरसेविका श्रीमती. हर्षदा ताई पवार व संपूर्ण टीम समाजात राजकारणच्या पलीकडे अनेक सामाजिक कार्य केले जातात याची प्रचित आपण वेळोवेळी आपल्या सामाजिक कामाच्या माध्यमातूम देत आहात प्रभागतील प्रत्येक व्यक्तीशी अल्प काळात आपण जी नाड जोडली आहे त्याच्या माध्यमातून आपले कर्तृत्व, दार्तृत्व, आणी मित भाषी असे वक्तृत्वच्या मार्फत दिसत आहे.
उमेश दादा & हर्षदा ताई यांनी डोक्यावर बर्फ, मुखी साखर,आणी पायात भिंगरी लावून प्रभागात प्रत्येक सोसायटीबद्दल असलेली तळमळ प्रत्येक कुटूंबा प्रती आस्था, स्नेह, जिव्हाळा व माझा प्रभाग म्हणजे माझा कुटूंब आहे आणी कुटूंब प्रमुख कसा असावा हे तुमच्या कडून अनेक परिवार शिकून घेत आहेत. तुम्ही एका प्रभगाच्या कुटूंब प्रमुखाची जबाबदारी अतिशय नम्र, व उत्साहाने पार पाडतात. प्रभागाचा केवळ भौतिक सुविधाचा विकास नव्हे तर एक प्रभागातील सर्वं नागरिकांशी आत्मीयतेने केलेली विचारपूस म्हणजेच प्रभागाच संपूर्ण विकास आणी संपूर्ण विकासात तुम्ही कुठे मागे नाहीत. प्रभागातील नागरिकांना जे हवं होत त्यात तुम्ही कुठे मागे राहिले नाहीत तुमच्या या अल्प काळातच राजकीय व सामाजिक कार्यकाळातुनच दिसून आले आहे. नवरात्र उत्सव म्हणजे केवळ गरबा उत्सव नव्हता तर वेगवेगळ्या सामाजिक, संस्कृतीक, कला च्या माध्यमातून आपल्या प्रभागातील महिलांना मुलाना व मुलींना आपल्या क्लेला वाव मिळावा हा त्या मागील तुमचा उद्देश प्रेरणादायी होता. अशी दूरदृष्टी ठेवून येणाऱ्या काळात आपल्या प्रभागातून बदलापूर शहरातून नव नवीन कलाकार नक्कीच घडतील. अशीच अथांग सागराप्रमाणे तुमची सामाजसेवा अविरीत पणे चालू राहील व एक तुमच्या राजकीय आलेखाची उंची उतुंग भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या DSP फाउंडेशन, समाजसेवक उमेशदादा, व कार्यकर्तृत्ववान नगरसेविका हर्षदा ताई पवार यांच्याकडून अशीच सामाजिक, संस्कृतीक व शैक्षणिक कार्य घडत रहो हीं दुर्गा माते चरणी पार्थना.
Comments
Post a Comment