*समता पॅनलच्या बॅनरखाली सर्व संघटनांची वज्रमूठ**सभासद हित व पारदर्शी कारभारासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकत्र*

*समता पॅनलच्या बॅनरखाली सर्व संघटनांची वज्रमूठ*
*सभासद हित व पारदर्शी कारभारासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकत्र*

शनिवार दि.२४/१०/२०२६ *सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉइज को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.मुंबई* च्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात *मा. खासदार, माजी केंद्रीय मंत्री श्री.आनंदरावजी अडसूळ* यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा पार पडली. संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र असून जवळपास 28 शाखा आहेत. तसेच 32000 सभासद असून अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सभासद आहेत.

या सभेसाठी समता पॅनेलचे सर्वेसर्वा, संस्थापक अध्यक्ष, सेकंडरीचे चाणक्य श्री.जे.आर.पाटील सर, शिक्षक भारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री.सुभाष मोरे सर शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाह श्री.शिवनाथ दराडे सर, शिक्षक - शिक्षकेतर सेना राज्य सरचिटणीस श्री.शिवाजी शेंडगे सर, स्नेहलता राणे गर्ल्स हायस्कूल,दादर चेअरमन श्री.विष्णु शेलार साहेब, बृहन्मुंबई शिक्षकेतर कर्मचारी संघटना मुंबई अध्यक्ष श्री.देविदास पंडागळे सर, शिक्षक भारती हिंदी विभाग प्रमुख श्री माताचरण मिश्रा सर,माजी संचालक श्री.राज बोराटे सर, माजी संचालक श्री.सत्येंद्र सिंह सर,शारदाश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.संजय कामथेकर सर आणि सेकंडरी सोसायटीतील भ्रष्टाचार उघडकीस आणणारे शिक्षक श्री.गणेश दळवी सर आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील सर्व पतसंस्था आणि बँकांच्या कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे आदरणीय श्री आनंदराव अडसूळ साहेब यांनी सेकंडरी पतसंस्था सभासदांचे आणि कर्मचाऱ्यांचे हित साधण्यासाठी आहे. एका व्यक्तीच्या मालकीची नाही. राज्यातील सर्व संघटना एकत्र येऊन विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात पॅनल तयार करत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. सभासद व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना काम करत असल्यामुळे माझा त्यांच्या समता पॅनलला सक्रिय व जाहीर पाठिंबा आहे. *जिंकण्यासाठी लढा, मी सर्व साधनसमग्रीसह आपल्या पाठीशी आहे* असा मोलाचा संदेश यावेळी श्री अडसूळ साहेब यांनी दिला.

1982 पासून समता पॅनल सर्व निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली जिंकले आहे. *चंद्रकांत पाटील यांना संधी दिली ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे* अशी कबुली संस्थापक समता पॅनल जीआर पाटील सर यांनी दिली. आता चूक सुधारण्याची वेळ आलेली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे मला त्यांनी बाजूला ठेवले. सभासदांचा पैसा हा सभासदांच्या हितासाठी वापरला पाहिजे या भूमिकेशी ठाम राहून मी चंद्रकांत पाटील यांना समता पॅनल मधून काढून टाकल्याचे जाहीर करतो. सर्व संघटनांचे प्रतिनिधी सातत्याने शिक्षण आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत असतात. म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली हे समता पॅनल नक्की विजयी होईल अशी मला आशा आहे, असे मत श्री पाटील सर यांनी व्यक्त केले.

सेकंडरी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत बाजीराव पाटील आणि संचालक मंडळाने गुपचूप पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे . जाणीवपूर्वक सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी कोणतीही माहिती सभासदांपर्यंत पोहोचू दिली नाही. तसेच प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये सर्व सभासदांचे पत्ते चुकीचे दिलेले आहेत. त्यामुळे विरोधी पॅनलला कोणत्याही सभासदांपर्यंत पोहोचता येणार नाही अशी कूटनीती आखली आहे. *संचालक मंडळाचा भ्रष्टाचार आणि एकाधिकारशाहीचा कारभार थांबवण्यासाठी समता पॅनलमधील प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही राज्यभर जोरदार प्रचार करून समता पॅनल निवडून आणू असा निर्धार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी एकत्रितपणे केला आहे.* तसेच सर्व सभासदांनी आपला पत्ता दुरुस्त करून घेण्यासाठी अध्यक्षांना पत्र पाठवावे असे आवाहन केले.

अधिक माहितीसाठी संपर्क 
गणेश दळवी 
9892488643

Comments

Popular posts from this blog

हिन्दी प्रवक्ता पद का कार्यभार ग्रहण किया

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन

सिटी इंटरनेशनल स्कूल की छात्राओं ने किया विद्यालय का नाम रोशन