कोल्हापूर मध्ये आज इतिहासकार प्रा.डॉ संदेश वाघ यांचा हस्ते पुस्तक प्रकाशन
कोल्हापूर मध्ये आज इतिहासकार प्रा.डॉ संदेश वाघ यांचा हस्ते पुस्तक प्रकाशन
कोल्हापूर : संबोध प्रकाशनाच्या वतीने प्रा. डॉ. चंद्रकांत कुरणे लिखित राजर्षी शाह महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचे बहुजन उद्धारक निवडक आदेश तसेच दादासाहेब मल्हारराव शिर्के यांच्या ब्रिटिश सत्ता आणि दलित लोक आणि करवीर सरकारचे दलितोद्धारक कानून या पुनर्प्रकाशित ग्रंथांचा प्रकाशन समारंभ आज रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता राजर्षी शाह स्मारक भवन, मिनी हॉल, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या ग्रंथांचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख इतिहासकार प्रा. डॉ. संदेश वाघ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय धम्म संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक चोकाककर राहणार आहेत.
प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे निवृत्त प्राध्यापक तथा महावीर अध्यासन केंद्राचे माजी संचालक प्रा. डॉ. बी. डी. खणे उपस्थित राहणार आहेत. राजर्षी शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांच्या बहुजन उद्धाराच्या कार्याचा दस्तऐवजी संदर्भ तसेच दलित समाजाच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या या ग्रंथांच्या प्रकाशन समारंभास नागरिक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते व इतिहासप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन सुवर्णा चंद्रकांत कुरणे, संबोध प्रकाशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment