*अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शिक्षणमंत्र्यांची भेट*
*अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शिक्षणमंत्र्यांची भेट*
राज्यात शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नवरात्र व दिवाळी सण तोंडावर आला आहे. अशा वेळी अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा टॅब कोणतीही पूर्वसूचना अथवा पत्रक न काढता थांबवणे बेकायदेशीर आहे. संचमान्यतेचे निकष बदलून जाणीवपूर्वक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवले जाते आहे.
वेतनाचा नवीन टॅब सुरू होईपर्यंत पूर्वीप्रमाणे वेतनाची पद्धत सुरू ठेवण्याची मागणी माजी शिक्षक आमदार कपिल पाटील आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षणमंत्री मा श्री दादाजी भुसे यांना केली.
माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर महिन्याचा पगार पत्रक न स्वीकारल्याने अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगार मिळणार नाही. वेळेवर वेतन न झाल्यास गृह कर्जाचे हप्ते थकतील. तसेच दैनंदिन खर्चासाठी आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. म्हणून शिक्षण मंत्र्यांनी तातडीने याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
सुभाष सावित्री किसन मोरे
9137654689
Comments
Post a Comment