*जि. प. शाळा पळसपूर येथील ३५ विद्यार्थ्यांना भाऊसाहेब आहेर यांच्यातर्फे गणवेश वाटप*
*जि. प. शाळा पळसपूर येथील ३५ विद्यार्थ्यांना भाऊसाहेब आहेर यांच्यातर्फे गणवेश वाटप*
पारनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळसपूर (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या ३५ विद्यार्थ्यांना सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक श्री. भाऊसाहेब आहेर यांच्यातर्फे गणवेशाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नवीन गणवेश देण्यात आला. गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, माजी चेअरमन, ग्रामसेवक, ग्रामस्थ तसेच शाळेतील शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
नवीन गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य पाहून उपस्थित ग्रामस्थही भारावून गेले. दररोज एकाच गणवेशात शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळाल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले होते.
यावेळी बोलताना श्री. बाळासाहेब आहेर सर म्हणाले, “की मुंबईत वास्तव्यास असूनही त्यांचे ज्या शाळेत शिक्षण झाले, त्या शाळेशी आणि गावाशी श्री भाऊसाहेब आहेर सर यांचे नाते आजही तितकेच घट्ट आहे. तसेच या शाळेचा मला सार्थ अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी माझ्या परीने काहीतरी योगदान देता आले, याचा मला मनापासून आनंद आहे.असे भाऊसाहेब आहेर सर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल शाळेचे शिक्षक श्री. आंधळे सर यांनी श्री. भाऊसाहेब आहेर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आपल्या शाळेसाठी काहीतरी करण्याची भावना यातून दिसून येते असे पत्रकार श्री राजेंद्र आहेर सर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment