ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र चौधरी यांच्या भव्य सेवापूर्ती समारंभ संपन्न.

ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र चौधरी यांच्या भव्य सेवापूर्ती समारंभ संपन्न.
मुंबई : जी.टी.बी.नगर (पूर्व)  येथील के.डी.गायकवाड मनपा  शाळा सभागृह येथील के.डी.गायकवाड   शाळेचे ज्येष्ठ शिक्षक  राजेंद्र किसन चौधरी यांचा भव्य सेवानिवृत्ती सत्कार समारंभ, शालेय व्यवस्थापन समिती व  शाळा परिवारातर्फे आयोजित करण्यात आला. अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक  विष्णू नवसू सातपुते  यांच्या हस्ते  सत्कारमूर्ती  राजेंद्र किसन चौधरी आणि त्यांच्या धर्म पत्नी सौ. सुनीता राजेंद्र चौधरी यांना शाल, श्रीफळ ,भेटवस्तू आणि मानपत्र देऊन  सम्मानित 
करण्यात आले. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून एफ/एन वार्ड चे प्रशासकीय अधिकारी  किसन पावडे साहेब, सुदाम चव्हाण साहेब, विभाग निरिक्षिका पूजा पाटील ,  प्रिती पाटील आणि कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी, धैर्यधर पाटील , अनिल सनेर यांची उपस्थिती होती.  प्रमुख वक्ते  चिखले साहेब यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन राजेश अवघडे सर यांनी  केले.  मनीषा यांनी मानपत्र वाचन केले  शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव यांनी श्री राजेंद्र चौधरी यांच्या पुढील आयुष्य आणि आरोग्य साठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव धनकुटे सर आणि विमला हरीशंकर यादव मॅडम व क.दा.गायकवाड शालेय इमारतीतल सर्व शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती