बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक श्री.संघपाल समाधान गवई यांचा सत्कार

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक श्री.संघपाल समाधान गवई यांचा सत्कार
 मुंबई 
दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी म्युनिसिपल मजदूर युनियन ,मुंबई  यांचे वतीने बाळ दंडवते स्मृति,  ना. म. जोशी मार्ग येथील संघटना कार्यालयात करण्यात आला. 
दि.  १९  फेब्रुवारी  २०२१ रोजी काॅटनग्रीन जलाशय येथे  श्री. गवई कर्तव्यावर असताना शस्त्रधारी दोन गुंड  चोरी करण्याच्या उद्देशाने घुसल्याचे गवईना दिसले  गवई यांनी प्रसंगावधान राखून त्या शस्त्रधारी  गुंडांचा सामना केला त्यांना चांगलाच चोप सुद्धा दिला.  मात्र ते दोघे असल्याने पळुन गेले.  
श्री.  संघपाल गवई यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन शस्त्रधारी गुंडांचा सामना केला व त्यांना पळवुन लावले आणि महानगरपालिकेच्या मालमत्तेचे रक्षण केले. 
सुरक्षा रक्षक श्री. संघपाल समाधान गवई यांच्या ह्या कर्तव्यनिष्ठ व धाडसी कामगिरीबद्दल  आज म्युनिसिपल मजदूर युनियनने  मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी श्री.  रविंद्र पाटील साहेब यांचे शुभहस्ते सन्मानपत्र , शाॅल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ह्या शुभ प्रसंगी  म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष श्री.  अशोक जाधव साहेब श्री.  वामन कविस्कर साहेब , कोषाध्यक्ष श्री.  शरद राघव तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे  उप प्रमुख सुरक्षा अधिकारी श्री.  विलास सुर्वे साहेब आणि विभागीय सुरक्षा अधिकारी श्री.  सुशिल बडेकर साहेब , म्युनिसिपल बॅकेचे संचालक व केईएम हाॅस्पीटलचे प्रशासकीय अधिकारी श्री. जालंदर चकोर साहेब तसेच सेवा सारथी चॅरिटेबल ट्स्टचे संस्थापक सरचिटणीस श्री.  डी. एम. गोसावी साहेब,  प्रशासकीय अधिकारी व पत्रकार  श्री.  आनंद कांबळे त्याचप्रमाणे  म्युनिसिपल मजदूर युनियनचे उपाध्यक्ष श्री. रामदास झांजले ( सुरक्षा खाते),  राजेंद्र माईनकर ( राणीबाग) श्री.  जनार्दन कांबळे  ( एफ दक्षिण  ) संघटक श्री.  विनायक मोरे , श्री.  नवनाथ पाटील,  श्री.  विनायक भोसले तसेच पत्रकार व कवी विनय दीप शर्मा  आदी मान्यवर उपस्थित होते. 
मुख्य सुरक्षा रक्षक ह्या पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल म्युनिसिपल मजदूर युनियनचे संघटक श्री. कैलासचंद्र मोहिते आणि अनिल म्हाप्रोळकर यांचाही ह्यावेळी सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती