युनिव्हर्सल एज्युकेशन अकॅडमी मुंबई संचलित नालंदा विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कालकथित .अड.माधवराव अनंतराव वाघ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
युनिव्हर्सल एज्युकेशन अकॅडमी मुंबई संचलित नालंदा विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कालकथित .अड.माधवराव अनंतराव वाघ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाध श्री.पी.झेड.रावते सर होते. कार्यक्रमाची सुरुवात कालकथित. अॅड. माधवराव वाघ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्री.पी.झेड.रावते सर यांनी वाघ साहेबांच्या शैक्षणिक कार्याचा आणि संस्थेच्या जडणघडणीतील त्यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पुष्प अर्पण करून वाघ साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. विद्यालयात सुबक फलक लेखन श्री.के.एस. कोळी सर यांनी केले व ककार्यक्रमाच सुत्रसंचलन सौ.एस.एच. भालेराव मॅडम यांनी केले.
Comments
Post a Comment