# *NDRFच्या प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*### *एन विभागातील शाळांमध्ये ‘शाळा सुरक्षितता व सार्वजनिक जनजागृती’ उपक्रम*

# *NDRFच्या प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*
### *एन विभागातील शाळांमध्ये ‘शाळा सुरक्षितता व सार्वजनिक जनजागृती’ उपक्रम*

*मुंबई :* बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि भारत स्काऊट आणि गाईड, उत्तर व दक्षिण मुंबई म.न.पा. जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एन विभागातील विविध मनपा शाळा संकुलांमध्ये ‘शाळा सुरक्षितता व सार्वजनिक जनजागृती कार्यक्रम’ घेण्यात आला.

बर्वेनगर मनपा शाळा संकुल क्र. ५ व ६, स. गो. बर्वेनगर शाळा संकुल क्र. ३/४, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी शाळा संकुल, रमाबाई सह.नगर, विक्रोळी पार्क साईट शाळा संकुल क्र. ३ व ४, पंतनगर, विक्रोळी पार्क साईट मनपा इंग्रजी शाळा, बर्वेनगर मनपा शाळा संकुल क्र. १ व २, साईनाथ नगर, जयंतीलाल वैष्णव मार्ग, माणेकलाल मेहता, जय महाराष्ट्र गणेश मैदान, धनजी देवशी, टिळक मार्ग म.न.पा. शाळा संकुल तसेच राजावाडी सीबीएसई संकुलांचा या उपक्रमात समावेश होता.

NDRF पथकाने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना *आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, CPR, अग्निसुरक्षा तसेच भूकंप व पूरस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत* मार्गदर्शन केले. अग्निशामक यंत्राचा वापर, CPR आणि प्रथमोपचार यांची प्रात्यक्षिकेही घेण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता प्रसंगावधान राखून सुरक्षिततेचे उपाय करण्याचे आवाहन पथकाने केले.

कार्यक्रमास *शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तिवर्धन किरदकुडवे, उपशिक्षणाधिकारी सायली सुर्वे, अधीक्षक (पूर्व उपनगरे) नंदु घारे आणि अधीक्षक तथा प्रशासकीय अधिकारी (शाळा) वीणा सोनवणे* यांचे मार्गदर्शन लाभले.

*प्रभारी विभाग निरीक्षक कैलास सरोदे, डॉ. संजय चव्हाण, कैलास भांगरे आणि मीरा शर्मा* यांचे सहकार्य लाभले.*

क्षेत्रसंघटक तथा जिल्हा चिटणीस, स्काऊट-गाईड विभाग धनाजी शेलवले* यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

NDRF टीम कमांडर *हनुमंत नांबा, राजू प्रसाद, राधेश्याम शर्मा* तसेच जवानांनी प्रशिक्षण दिले. *संघटक तानाजी मोरे, स्काऊट पर्यवेक्षक बिरप्पा पुजारी, गाईड पर्यवेक्षक सीमा आबनावे*, मुख्याध्यापक, इमारत प्रमुख आणि शिक्षकांनी आयोजनात सहकार्य केले.

*या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपत्तीच्या वेळी सुरक्षितता, प्रसंगावधान आणि बचावकार्याबाबत प्रत्यक्ष माहिती मिळाली.*

**‘सुरक्षित शाळा – सुरक्षित विद्यार्थी – सुरक्षित समाज’** हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

*शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार- सुभाष मोरे*

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन