*अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 6 महिन्याचे थकीत वेतन मिळण्यासाठी शिक्षक भारती विशेष शाळा युनिटचे आंदोलन**आठ दिवसांत थकीत वेतन देणार*
*अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 6 महिन्याचे थकीत वेतन मिळण्यासाठी शिक्षक भारती विशेष शाळा युनिटचे आंदोलन*
*आठ दिवसांत थकीत वेतन देणार*
मुंबई शहर व उपनगरातील विशेष शाळांतील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य पद्धतीने रोखलेल्या 6 महिन्यांच्या वेतनासाठी चेंबूर येथील समाज कल्याण कार्यालयात अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वतीने शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर आणि उपनगर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गैरहजर असल्याने शिक्षक भारती संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त केला. अधिक्षक श्रीमती रूपाली पाटील यांनी चर्चेदरम्यान काही कर्मचाऱ्यांना एक दिवसांपूर्वी वेतन अदा केलेले असून उर्वरित कर्मचाऱ्यांना आठ दिवसांत थकीत वेतन दिले जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
चुकीच्या पद्धतीने पटनिर्धारणाचे निकष वापरून विशेष शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्यात आले होते. त्या प्रक्रियेस मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वरीष्ठ कार्यालयात हरकत घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्यापी चौकशी झाली नाही. याउलट
शासनाचे कोणतेही आदेश नसतांना गेली सहा महिने या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखून धरले आहे. वेतन रोखल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गृहकर्जाचे हफ्ते थकले आहेत. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी उसनवारी करावी लागत आहे. कर्मचारी त्रस्त झाले असून अनेकदा पत्रव्यवहार करून देखील दखल न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी आंदोलन केले.
आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर एक दिवसापूर्वी काही कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून आठ दिवसात वेतन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चर्चेत ठरल्याप्रमाणे थकीत वेतन न मिळाल्यास मा.ना. श्री. अतुल सावे मंत्री महोदयांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला.
यावेळी मुंबई शिक्षक भारतीचे अध्यक्षा कल्पना शेंडे, उपाध्यक्ष अशोक शिंदे, मुंबई पदाधिकारी भाऊसाहेब पानमंद, बाळासाहेब चव्हाण आणि विशेष शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क
सोनाली बाणे
9076011166
Comments
Post a Comment