'Clinical Yoga OPD Initiative' उपक्रमाची मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते दखल
'Clinical Yoga OPD Initiative' उपक्रमाची मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते दखल
मुंबई : योगतज्ज्ञ डॉ. अजय र. कुंभार यांच्या Clinical Yoga OPD Initiative या समाजोपयोगी आरोग्य उपक्रमाची दखल घेऊन महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांनी प्रोत्साहन व कौतुक व्यक्त केले.
वैज्ञानिक व पुराव्यावर आधारित योगाच्या माध्यमातून तणाव व्यवस्थापन, जीवनशैलीजन्य आजारांचे प्रतिबंध, तसेच सर्वांगीण आरोग्य संवर्धनासाठी हा उपक्रम कार्यरत आहे. या उपक्रमाला मिळालेली दखल ही जनआरोग्य क्षेत्रात योगाचे वाढते महत्त्व अधोरेखित करणारी असल्याचे मानले जात आहे.
यावेळी डॉ. अजय र. कुंभार यांनी मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की, "हा सन्मान माझ्यासाठी अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असून, वैज्ञानिक योग व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे."
'निरोगी महाराष्ट्र – सशक्त महाराष्ट्र' या ध्येयाने समाजहितासाठी कार्य सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment