महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला 
मुंबई 
गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना म्युनिसिपल मजदूर युनियनच्या प्रतिनिधीत्वाखाली, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय विभाग मुख्यालय एफ दक्षिण,परळ कार्यालयात निदर्शने केली. गेल्या दोन वर्षांपासून प्रशासन कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देत न ​​होते,केवळ आश्वासने देत होते, मात्र सकारात्मक निर्णय घेत नव्हते. पदोन्नतीसह वेतनातील तफावत, वेतनश्रेणी देण्यास टाळाटाळ,पद श्रृंखला न करता पाहून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. महानगरपालिका मजदूर युनियन मुंबईच्या वतीने प्रशासनाविरोधात आणि कर्मचाऱ्यांना हक्क मिळवून देण्याबाबत आंदोलन करण्यात आले. महापालिका कार्यालयाच्या आवारात सकाळी 10 वाजल्यापासून 300 हून अधिक कर्मचाऱ्यांनी उपस्थिती नोंदवली. आंदोलनाचे उग्र रूप पाहून प्रशासनाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.वल्ले पवार व आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांनी दुपारी दोन वाजता युनियन व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सर्व कर्मचारी आमचे असून आंदोलन थांबवू, असे आश्वासन दिले. येत्या 10 दिवसांत पदोन्नती समितीच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांना लवकरच पदोन्नती दिली जाणार आहे. पदोन्नती सोबतच ग्रेड पे आणि पद श्रृंखला नियम ही लागू केले जातील. युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, कार्याध्यक्ष यशवंत देसाई, सहाय्यक सचिव प्रदीप नारकर, उपाध्यक्ष संदीप भरणकर, उपाध्यक्ष संजय बने,संघटक प्रवीण कदम, विठ्ठल गावडे, महेश दळवी,तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष भालचंद्र वाणी, कार्याध्यक्ष सुनील कर्पे,सरचिटणीस विनय कुमार शर्मा,चिटणीस रवींद्र पवार,उपाध्यक्ष अनिल वायदंडे नायर रुग्णालय,संघटक सुधीर कोरडे, शंकर खरात,नायर रुग्णालय दंत महाविद्यालय तक्रार निवारण समिती सरचिटणीस बाळू शिंदे युवा अध्यक्ष ललित वाघेला युवा सरचिटणीस योगेश जाधव, केईएम रुग्णालय तक्रार निवारण समिती  अध्यक्ष प्रफुल अहिरे सरचिटणीस वैभव जुवेकर, क्षयरोग रुग्णालय शिवडी तक्रार निवारण समिती अध्यक्ष मिलिंद नाईक,कीटकनाशक विभाग तक्रार निवारण समिती अध्यक्ष विनोद घुगे सरचिटणीस नागेश गावडे प्रकाश झोरे,रुग्णालय सायन तक्रार निवारण समिती  सरचिटणीस अतिश जाणवलेकर,तसेच पूर्णवेळ कार्यकर्ते अशोक सावंत, राजाराम पुरळकर, चंद्रकांत कांबळे, दत्ताराम काजरोळकर, मनोहर कांबळे,विजय मासरणकर,प्रसाद जाधव,कुटुंब कल्याण माता बाल संगोपन विभागातील अखिल शिंगाडे, विनायक भोसले,राहुल तायडे, स्वच्छता निरीक्षक रवींद्र जाधव, गणेश गोडीक सह सर्वेलंस संघटक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न