CBSE संलग्न 11 शाळांच्या विद्यार्थ्यांनी CBSE मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेत 2025 - 26 मध्ये उल्लेखनीय यश

CBSE संलग्न 11 शाळांच्या विद्यार्थ्यांनी CBSE मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेत 2025 - 26 मध्ये उल्लेखनीय यश

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून सुरू करण्यात आलेल्या एकूण 18 मुंबई पब्लिक स्कूल सीबीएसई  शाळांपैकी  10 सीबीएसई शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथमच सीबीएसई दहावी परीक्षा दिली होती, तसेच एका शाळेतील विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली होती. त्या इ.10 परीक्षेचा निकाल आज लागला आहे.                                                                                
CBSE संलग्न 11 शाळांच्या विद्यार्थ्यांनी CBSE मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेत 2025 - 26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत मनपा CBSE शाळांचा एकूण निकाल 92.89%  इतका लागला असून, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रगती दर्शवली आहे. 
ठळक बाबी:
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी:339
एकूण निकालाची टक्केवारी: 92.89%
90% जास्त गुण प्राप्त करणारे विद्यार्थी :35.
100% निकाल  भवानी शंकर, पूनम नगर,राजावाडी व मिठागर या 4 शाळांचा लागला आहे.

मिठागर सीबीएसई शाळेतील कुमारी आर्या लामने ह्या विद्यार्थीने 97.8 गुण मिळवून मनपा शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच मनपा शाळांमधून  प्रथम 5 येणाऱ्या विद्यार्थी खालील प्रमाणे -
1. आर्या लामने - मिठागर सीबीएसई - 97.8
2. सौरभ यादव- पूनम नगर सीबीएसई - 97.2
3. कौस्तुभ त्रिपाठी - राजावाडी सीबीएसई - 97
4. आर्यन मयेकर- पूनम नगर सीबीएसई - 96.6
5. श्रेया सिंग - पूनम नगर सीबीएसई - 96.4
6. माही सोळंकी -मिठागर सीबीएसई - 96.2
गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांमध्ये लक्षणीय प्रगती
मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या  विद्यार्थ्यांचे  उल्लेखनीय प्रमाण...
विद्यार्थ्यांचे हे यश शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे फलित आहे.
महानगरपालिकेचे सन्मा.आयुक्त,मान.अतिरिक्त आयुक्त,मान.शिक्षण समिती अध्यक्षा मान उपयुक्त(शिक्षण), तसेच शिक्षण अधिकारी  माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मनपा शिक्षण विभाग दर्जेदार व सर्वसमावेशक शिक्षण देण्यास कटिबद्ध असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही विविध उपक्रम राबविण्यात येतील.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*