बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आला 
*स.नि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*

मुंबई 
समिती मार्फत मंगळवार दिनांक १०/०३/२०२६ रोजी मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला.श्रीमती वैशाली गिल आणि श्रीमती त्रिशीला कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाला श्रीमती वैशाली गिल, स्मिता चव्हाण, त्रिशीला कांबळे, मीनल जाधव, मीनाक्षी डोंगरे, डॉक्टर राजश्री कोलारकर, रोहिणी झगडे, ज्योती शार्दुल, कविता विशे, सोनल अंकुश, नयना देहरेकर तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला उपस्थित होत्या.अध्यक्ष श्रीमती वैशाली गिल यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरण व शिक्षण या विषयावर मत मांडले. श्रीमती त्रिशीला कांबळे यांनी स्त्रियांच्या चळवळीपासून आंदोलनापर्यंत सर्व उपयुक्त माहिती दिली. डॉक्टर राजश्री कोलारकर यांनी श्री हक्क व स्त्री आरोग्य या विषयावर भाषण केले. श्रीमती मीनाक्षी डोंगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सुभाष मारुती अंकुश आणि एकनाथ सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जितेंद्र बोरीचा, सुबोध तांबे, शिवदास गवारी ,सुरेश पवार, मच्छिंद्र कोलगे ,पोपट असावरे, देविदास पवार श्री सुभाष अंकुश यांनी विशेष परिश्रम घेतले.श्री प्रदीप नारकर साहेब सहाय्यक सरचिटणीस म्युनिसिपल मजदुर युनियन यांनी हॉल मिळवुन देण्यासाठी विशेष सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न