बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग माध्यमिक विक्रोळी पार्क साईट पासपोली भागशाळा मनपा माध्यमिक शाळा विक्रोळी पश्चिम मुंबई ७९.श्री रामभाऊ लक्ष्मीबाई हरी काकड ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक यांना सेवानिवृत्तीच्या विशेष क्षणी समर्पित

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग माध्यमिक 

विक्रोळी पार्क साईट पासपोली भागशाळा मनपा माध्यमिक शाळा विक्रोळी पश्चिम मुंबई ७९.
श्री रामभाऊ लक्ष्मीबाई हरी काकड ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक यांना सेवानिवृत्तीच्या विशेष क्षणी समर्पित 

नैसर्गिक सुंदरता व धार्मिक महत्त्व लाभलेल्या नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे या गावी आई सौ.लक्ष्मीबाई व वडील हरिभाऊ नामदेव काकड यांचे चतुर्थ संतान म्हणून दिनांक ०१/०६/१९६६ तिथीनुसार रामनवमी च्या पावनदिनी एका सुखी व संपन्न परिवारात आपला जन्म झाला. रामनवमीमुळे आपले नामकरण रामभाऊ असे करण्यात आले. गावातीलच जिल्हा परिषद शाळेत आपले प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक शिक्षण यशवंत विद्यालय निमोण तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे झाले. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण सिन्नर महाविद्यालय येथे झाले. आपण इंग्रजी या विषयांमध्ये स्नातक (B.A.) झालात. पुढील पदव्युत्तर शिक्षण नाशिकचे प्रसिद्ध महाविद्यालय के.टी.एच.एम.नाशिक या कॉलेजमध्ये घेतले. इंग्रजी विषयातच आपण स्नातकोत्तर पदवी (M.A.)प्राप्त केली. व्यावसायिक पदवीचे शिक्षण (B.ED.)कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंब्रा ठाणे येथे झाले. आपल्या कुटुंब पत्नी आणि दोन मुले असे 'हम दो हमारे दो' छोटेसे कुटुंब आहे. त्यातील एक बी.इ.सिविल करून जलसंपदा विभागामध्ये महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत आहे तर दुसरा एम एस सी बायोटेक पदवीधर आहे.

1992 पासून आपला शिक्षण सेवेचा प्रारंभ झाला गावातच जिल्हा परिषद शाळेवर आपण दोन वर्ष कार्यरत राहिलात. 1994 ते 96 या कालावधीत आपण माध्यमिक विद्यामंदिर निराळे येथे सहाय्यक शिक्षण म्हणून कार्यरत राहिलात.

सन 1996 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागात प्रसिद्ध कुलाबा मनपा माध्यमिक शाळेत आपली नियुक्ती झाली.अल्पावधीतच आपण विद्यार्थ्यांचे प्रिय शिक्षक झालात. सन 2011 पासून आपण विक्रोळी पार्कसाईट मनपा माध्यमिक शाळेत कार्यरत आहात. सन 2018 मध्ये शिक्षण विभागाने आपणास मुलुंड कॉलनी मनपा इंग्रजी माध्यमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी दिली होती आपण योग्यरीत्या पार पडली. सन 2021 पासून विक्रोळी पार्कसाईट शाळेची भागशाळा बनलेली पासपोली मनपा.माध्यमिक शाळेमध्ये आजतागायत आपण कार्यरत आहात.
सन 2009 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इंग्लंडच्या शैक्षणिक दौऱ्यात आपली निवड करण्यात आली. येथील शैक्षणिक संस्थांना दिलेल्या भेटीचा अभ्यासपूर्ण अहवाल आपण मुंबई महानगरपालिकेला सादर केला.
मनपाच्या सर्व माध्यमिक शाळा एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून आपला नावलौकिक आहे. आपण संपूर्ण सेवा काळात अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले ज्यामध्ये मराठी माध्यमिक विभागात सतत 100% निकाल,अनेक सामाजिक संस्था द्वारा विद्यार्थी उपयोगी वस्तू,शैक्षणिक साहित्य इयत्ता दहावी साठी प्रश्नसंच नवनीत गाईड मिळवून देण्यात आपला खूप मोलाचा वाटा आहे. आपल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत सन 2009 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून आदर्श शिक्षक 'महापौर पुरस्कार'देऊन आपला गौरव करण्यात आला. आपले अनेक विद्यार्थी प्रशासनामध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांना व सहकारी शिक्षकांना सतत योग्य मार्गदर्शन केल्यामुळे आपण विद्यार्थ्यांमध्ये 'विद्यार्थीप्रिय शिक्षक'व शिक्षकांमध्ये 'शिक्षक प्रिय' शिक्षक म्हणून कायम सर्वांच्या मनात राहिलात व राहणार. आपले शैक्षणिक योगदानासोबतच सामाजिक योगदान ही भरपूर असे आहे. आपण एक प्रामाणिक व्यक्ती, मनमिळावू,मार्गदर्शक, सहकारी, प्रशासक,मित्र, प्रेरणादायी शिक्षक म्हणून कायम मनात राहणार.

शेवटी यावेळी आमची इच्छा आहे की आपले पुढील आयुष्य सुखी संपन्न समृद्ध व आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा!!



 *आम्ही आहोत* ,
विक्रोळी पार्क साईट पासपोली (भागशाळा) मनपा माध्यमिक शाळा सर्व शिक्षक कर्मचारी वृंद.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला