हनुमान जन्मोत्सवानिमित्त विशेष सार्वजनिक व्याख्यान व आध्यात्मिक उत्सव यशस्वीरीत्या संपन्न

हनुमान जन्मोत्सवानिमित्त विशेष सार्वजनिक व्याख्यान व आध्यात्मिक उत्सव यशस्वीरीत्या संपन्न
मुंबई, भांडुप पश्चिम | दिनांक : २ एप्रिल २०२६

हनुमान जन्मोत्सव २०२६ निमित्त मारुती मंदिर, लेक रोड, भांडुप पश्चिम, मुंबई येथे विशेष सार्वजनिक व्याख्यान व आध्यात्मिक उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला.

या प्रसंगी सुप्रसिद्ध योगतज्ज्ञ, क्लिनिकल योग चिकित्सक आणि संशोधक डॉ. अजय रविंद्र कुंभार यांनी“हनुमान चालीसा योगसाधना म्हणून : एकात्मिक मनो-आध्यात्मिक आणि क्लिनिकल योग दृष्टिकोन”या विषयावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले.

आपल्या व्याख्यानात डॉ. कुंभार यांनी हनुमान चालीसाचा मंत्रयोग, जप साधना, प्राणायाम, ध्यान, मानसिक संतुलन आणि ताण-नियंत्रण यासाठी कसा उपयोग होतो याचे सखोल विवेचन केले. नियमित पठण आणि ध्यान साधनेमुळे मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान सामूहिक हनुमान चालीसा पठण, ध्यान साधना आणि कीर्तनामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. उपस्थित भाविक, युवक आणि स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले.

या यशस्वी कार्यक्रमासाठी विशेष आभारश्री परशुराम कोपरकर जी, संजीवा पुजारी जी, अशोक जी, आशीष शेलार जी आणि नारायणन जीयांचे मानण्यात आले. त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*