स्व. ललिता गुलाटी जी .... जन्माने पंजाबी त्यामुळे अगदी सुदृढ बांधा व सदैव तेजःपुंज चेहरा
स्व. ललिता गुलाटी जी .... जन्माने पंजाबी त्यामुळे अगदी सुदृढ बांधा व सदैव तेजःपुंज चेहरा
एका विशिष्ट गोड लकबीने मराठीतच बोलणं आणि वागणंही.... शंभर टक्के सकारात्मक दृष्टिकोन...शिक्षणासाठी अविवाहित 100% समर्पित जीवन... कोणालाही कोणत्याही स्तरावर कोणतीही मदत करण्यास केव्हाही तत्पर... स्वतःहून जबाबदारी खेचून घेणे आणि ती संधी समजून तिचं सोनं करणं हा आवडता छंद.... सर्व थराच्या, सर्व स्तराच्या लोकांमध्ये सहज विरघळून जाणे हा मोठा विशेष गुण... उच्च दर्जाचे राहणीमान तितकेच स्वच्छ विचार... सर्वोच्च गुणसंपन्न... कोणाबद्दल स्वप्नातही वाईट विचार करायचा नाही ही विचारांची बैठक.... माणसे जोडून ठेवण्याची अजोड वृत्ती... अशा अलौकिक परमोच्च सदगुणांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ललिताजी ....
आपल्या या ज्येष्ठ भगिनीस त्यांच्या हीरक महोत्सवी जन्मदिनी मानाचा मुजरा......😢😭😓😭😞😞😞 जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Comments
Post a Comment