ललिताजी गेल्या...., बातमी ऐकली आणि अवघा शिक्षण विभाग स्तब्ध, सुन्न ,शोकाकूल झाला....
ललिताजी गेल्या...., बातमी ऐकली आणि अवघा शिक्षण विभाग स्तब्ध, सुन्न ,शोकाकूल झाला....
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या आन, बान, शान..... सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत.... आदर्श शिक्षकत्वाचा परमोच्च दीपस्तंभ.... सर्वांगिण, सर्वंकष सद्गुणांचे मूर्तिमंत उदाहरण.... सद्गुणी सहकारी आणि मित्रत्वाचे साक्षात जागृत रूप....सळसळते चैतन्य.... अजिंक्य, अद्वितीय व्यक्तिमत्व... प्रचंड जबाबदारी स्वीकारून लिलया पार पाडण्याची कला.... क्षणार्धात समोरच्याच्या मनावर गारूड करण्याची कला.... सर्व विषयांवर जबरदस्त पकड .... तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पालिका, जिल्हा,राज्य, देश पातळीवर निर्माण केलेला दबदबा... सर्व कला, कौशल्ये पारंगत....शेकडो पुरस्कारांनी व थेट राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत .... संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या जीवनात आनंदाची पखरण करणाऱ्या आपल्या सर्वांच्या परमप्रिय ललिताजी, आपल्या सर्वा सर्वांनाच खोल खोल शोकसागरात सोडून स्वर्गाची शोभा वाढविण्यासाठी सहज, नकळत निघून गेल्या. जणू आपल्यातून निवृत्ती घेऊन साक्षात देवतांचे स्वागत स्वीकारण्यासाठी गेल्या.आज आज स्वर्गलोक गर्भश्रीमंत झाला..... ललिताजी, दोन वर्षेच झाली की हो निवृत्त होवून, किती भरभरून स्वतः साठी जगायचे राहूनच गेले ना...अजून खूप खूप काही शिकून घ्यायचे होते हो सर्वांना आपल्याकडून...आपण सद्गुण , कौशल्यांचा अथांग महासागर होतात... एखादे काम हाती घेतले की वेळ,काळ,पैसा,त्रास कशाची तमा नाही हो बाळगलीत... ते ते सारे भाग्यवान ज्यांना आपल्या सोबत काम करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली....सारे सारेच पोरके झाले हो.... सर्वोच्च अधिकारी असो की सर्वात कनिष्ठ कर्मचारी आज प्रत्येकाच्या हृदयात कायमचे अढळ स्थान निर्माण करून गेलात एवढे मात्र नक्की.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
महेंद्र सावंत
Comments
Post a Comment