आदर्श शिक्षक रामभाऊ लक्ष्मीबाई हरी काकड प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त.

आदर्श शिक्षक रामभाऊ लक्ष्मीबाई हरी काकड प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त.
पवई मुंबई दिनांक-11 एप्रिल 2026 रोजी वि. पा. सा. भागशाळा पासपोली मनपा माध्य मराठी शाळा, पवई येथे कार्यरत ज्येष्ठ शिक्षक श्री. रामभाऊ काकड यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ व कृतज्ञता सोहळा भव्य व दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी एच. आर.यु.बी. ग्रुपचे श्री. बस्तीराम आव्हाड (बिल्डर्स),नगरसेवक सुनील चौधरी, शिक्षण परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे, मनपा अधीक्षक किसनराव पावडे, माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, सिन्नरचे माजी सभापती  बाळा साहेब वाघ, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब काकड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सोपान काकड साहेब, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी डायस मॅडम, मुख्याध्यापक दादासाहेब देवडकर,शंकर पवार, राजाराम जळके,  कातडे मुख्याध्यापिका डहाळे, मुख्या. विनोदकुमार पासी सर, सचिव शिरसाट, देऊळकर, हिवाळे, भारत काकड, प्रहार संघटनेचे विकास घुगे, सेकंडरी पतसंस्थेचे संचालक भाऊ साहेब आहेर, महापालिका संघाचे उपाध्यक्ष बागल सर, छात्रभारतीचे  ढाले, शिक्षक भारतीचे प्रमुख महाडिक ,सेवानिवृत्त मुख्या.विकास पाटील,विलास घेरडे, चांदभाई काद्री, शेवाळे,राम जाधव,सुरेश आभाळे   पांडुरंग करे, बाळू पवार, अनिता चौधरी, सुजाता काटकर, ज्योती किसवे ,अनिता जाधव,मृणाल रावराणे, भारती नेहते, माधुरी सोलेगावकर विविध शाळेतून आलेले मुख्याध्यापक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सरांचे आई वडील, बहीण परिवारासहित सर्व सदस्य, गावातील मित्रपरिवार  के.एम. आव्हाड, दत्तात्रय सानप, वंसत वाघ, बाबा काकड, भाऊसाहेब सांगळे, भास्कर काकड, चांगदेव काकड, संजय देशमुख, रमेश काकड, सचिन काकड, सुकदेव काकड, दादापाटील सांगळे निहाळे गावातील प्रतिष्ठित गावकरी, पदाधिकारी, रविदर्शन सोसायटीतील अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, बिल्डर्स, विविध संघटनेचे पदाधिकारी, पासपोली शाळा संकुलातील सर्व माध्यमांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वि. पा.सा. शाळेतील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित राहून, रामभाऊ काकड सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. भव्य दिव्य असा सेवापूर्ती सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापौर आदर्श शिक्षक पुरस्कृत  सलीम मासुलदार यांनी प्रास्ताविक केले तर नरेंद्र पालवे सर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील प्र. मुख्याध्यापक संजय पाटील, अजमत शेख, सुप्रिया सिंग, आलोक शर्मा, पिरप्पा गवंडी, ज्ञानेंद्र राम, सविता यादव, अंजली मोरे, रेखा यादव, वृषाली गायकवाड व विद्यार्थी यांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला