आदर्श मुख्याध्यापक अंबरसिंग मगर सर यांचा 29 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीची गौरवशाली सेवापूर्ती संपन्न.

आदर्श मुख्याध्यापक अंबरसिंग मगर सर यांचा 29 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीची गौरवशाली सेवापूर्ती संपन्न.                                                         

बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातील स. गो.बर्वेनगर माध्यमिक शाळा घाटकोपर या शाळेचे मुख्याध्यापक अंबरसिंग सुभद्रा सुकदेव मगर सर. 29 वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर निवृत्त होत असल्याने  त्यांना शुभेच्छा व गोड निरोप देण्यासाठी शाळा प्रशासन आणि पालक, विद्यार्थी यांच्या वतीने  सेवा पूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार  डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षक संघ मुंबई चे संस्थापक अध्यक्ष सुरेश डावरे, आणि बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  कीर्तीवर्धन किरतकुडवे, उप शिक्षणाधिकारी (मध्यवर्ती)  मुख्तार शाह, उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  आरती खैर तसेच अधीक्षक (शाळा), किसन पावडे पाटील, अधीक्षक (शाळा)  नंदू नाना घारे, विभाग निरीक्षक  सुनीता खाडे, विभाग निरीक्षक अल्मास शेख,माजी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ख्रिस्तिना डायस,यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक आणि प्राथमिक विभागातील अनेक विद्यमान आणि माजी मुख्याध्यापक व शिक्षक तसेच पालक आणि आजी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी  अंबरसिंग मगर, त्यांच्या सुविद्य पत्नी मुख्याध्यापिका  सविता मगर यांच्यासह संपूर्ण परिवार आणि आप्तेष्ट, गणगोत आणि गावाकडील मित्र परिवार आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश डावरे सर, तसेच प्रमुख अतिथी  ज्ञानेश्वर म्हात्रे सर. यांनी आपल्या मनोगतात श्री. मगर यांच्याबद्दल गतकाळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. अंबरसिंग मगर हे केवळ मुख्याध्यापकच नव्हे तर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रतिनिधित्व करणारे उत्तम व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जे उत्तमोत्तम कार्य केले ते अविस्मरणीय आहे. कोरोना आपत्कालीन काळात ऑनलाईन आणि डिजिटल स्वरूपात शिक्षण देण्यासाठी निर्माण केलेल्या झूम मीटिंग, गुगल मीट सारख्या प्लॅटफॉर्म ची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. माध्यमिक शिक्षण विभागातील तंत्रस्नेही शिक्षकांना शोधून त्यांची मोट बांधली. आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा यशस्वी राबविली. तसेच कोरोना आपत्कालीन परिस्थितीत जोखीम पत्करून, स्वतःच्या शाळेतील ज्या विद्यार्थ्याकडे ऑनलाईन साधने उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी शाळेतील शिक्षणवृंद यांना सोबत घेऊन शालेय परिसरात मोकळ्या मैदानात सुरक्षित शाळा भरवली. तसेच गरजू पालकांना आवश्यक मदत केली. एवढेच नव्हे तर. प्रत्येक वर्षी एसएससी बोर्ड निकाल वृद्धीसाठी आवश्यक उपाययोजना शाळेत राबविली. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्यात. प्रशासनाच्या माध्यमातून शाळेत डिजिटल क्लासरूम, टिंकरिंग लॅब, मिनी सायन्स लॅब तसेच सुसज्ज प्रयोगशाळा आणि ग्रंथालय सारख्या सुविधा अद्यावत करून दिल्यात. शिक्षणा बद्दल पालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी परिसरातील योग्य व्यक्तींना सोबत घेऊन गृहभेटी दिल्यात. शाळाबाह्य विद्यार्थी,गैरहजर विद्यार्थी, यांना शोधून शोधून शाळेत उपस्थित केले. तसेच विद्यार्थ्यांची शालेय शिस्त, शारीरिक मानसिक आरोग्य, संतुलित राहावे म्हणून दैनंदिन परिपाठात योगा, आणापाना, मैदानी कवायत सारखे उपक्रम राबविले.असे विविध शालेय कार्यक्रम राबविण्यात यशस्वी ठरलेले, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आणि आदर्श व्यक्तिमत्व अंबरसिंग सुभद्रा सुकदेव मगर, यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा देताना प्रत्येक वक्ता भरभरून बोलत होता. वेळेअभावी अनेक वक्त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यास संधी देखील मिळाला नाही. अश्याप्रकारे एक आगळावेगळा आणि अविस्मरणीय असा निरोप समारंभ संपन्न झाला. हा प्रसंग विद्यार्थी, पालक. शिक्षक आणि प्रशासन यांच्या कायम स्मरणात राहील. यात तिळमात्र शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला