श्री आप्पासाहेब बागल सर यांचा त्यांची जन्मभूमी लेंगरे गावात शिक्षण घेतलेल्या विद्या मंदिर दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करण्यात आला.
श्री आप्पासाहेब बागल सर यांचा त्यांची जन्मभूमी लेंगरे गावात शिक्षण घेतलेल्या विद्या मंदिर दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करण्यात आला.
लेंगरे : लेंगरे येथील शेठ चतुरलाल गणपतचंद शहा विद्यामंदिर, लोंगरे या विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक आप्पासाहेब बागल सर यांना प्रमुख पाहूणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.ज्या विद्यालयात प्राध्यापक आप्पासाहेब बागल सर यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले, त्याच विद्यालयाने गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार सोहळ्यासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून सन्मानित केल्याने हा क्षण त्यांच्या जीवनातील अत्यंत आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.
विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा गौरव करताना आपल्या माजी विद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळणे ही त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील विशेष अभिमानाची बाब ठरली.
साखराळे येथील वारकरी सांप्रदायाच्या विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय जयंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
साखराळे : साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली येथे साखराळे गावच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते प्राध्यापक आप्पासाहेब बागल सर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
साखराळे येथील विठ्ठल मंदिराच्या मंडपाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भक्तजन व नागरिकांच्या उपस्थितीत श्री. जयंतराव पाटील यांच्या हस्ते प्राध्यापक श्री आप्पासाहेब बागल सर यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेणारा असून त्यांच्या जीवनातील एक आनंददायी व संस्मरणीय क्षण ठरला.
प्राध्यापक आप्पासाहेब बागल सर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment