एस. जी.बर्वे नगर शाळा संकुलात स्वातंत्र्य दिन समारोह साजरा

एस. जी.बर्वे नगर शाळा संकुलात स्वातंत्र्य दिन समारोह  साजरा
मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग द्वारा संचालित एस. जी.बर्वे नगर शाळा संकुलात  उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मुख्य अतिथि उपशिक्षणाधिकारी सायली सुर्वे मॅडम आणि माध्यमिक विभाग उपशिक्षणाधिकारी आरती खेर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन, भाषणे, देशभक्तीपर गीते, नृत्य, नाटिका तसेच नशामुक्तीवर आधारित प्रभावी नाटिका सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारताचा संदेश देत रॅली काढली व नशामुक्त भारत" चे उत्स्फूर्त नारे देऊन जनजागृती केली.
 कार्यक्रमात इंग्रजी UPS शाळेच्या मुख्याध्यापीका तसेंच बिल्डिंग इन्चार्ज रुबी थापर मॅडम, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक शेंडे सर, इंग्लिश प्राथमिक च्या इन्चार्ज मोनिका सिंह सोबतच प्रीती दिघे मॅडम तसेंच माध्यमिक च्या इन्चार्ज कल्पना जगताप मॅडम, तसेंच मराठी माध्यम प्राथमिक विभागाचे इन्चार्ज महावीर खैरे सर उपस्थित होते. कार्यक्रमात   शिक्षक, विद्यार्थी, पालक, SMC सदस्य तसेच सर्व संबंधितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांच्या सहकार्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि सामाजिक संदेश देणारा ठरला.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

*शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार- सुभाष मोरे*

सीए परीक्षा में अनुष्का उमेश शुक्ला की शानदार सफलता