जया अंगी मोठे पणा तया यातना कठीण.

जया अंगी मोठे पणा तया यातना कठीण. 
     म्हणजेच जितके मोठे पणा तितकाच मोठा संघर्ष
असच एक भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.(आठवले) यांच्या विचारातून तयार झालेले
 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राज्य सचिव - बाळकृष्ण आर. जे. गायकवाड(मामा) अतिशय संघर्षातून निर्माण झालेले व्यक्तिमत्व म्हणजेच गायकवाड (मामा) तसे बघायला गेले तर यांचं मूळ गाव वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर परंतु गायकवाड (मामांचा) जन्म निऱ्हाळे गाव तालुका. सिन्नर जिल्हा. नाशिक येथे झाला. हे गाव आईच्या मामाचे आहे.
परंतु गायकवाड मामा यांचे लहानपण सर्व त्यांच्या आईच्या माहेरी म्हणजेच त्यांच्या मामा च्या गावी म्हणजेच मुक्काम  पोष्ट- चिंचोली गुरव तालुका-- संगमनेर जिल्हा. अहिल्यानगर याच ठिकाणी त्यांचे शालेय शिक्षण १ते ४ जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्या नंतर ५ वी ते १० पर्यंत चे शिक्षण श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय हायस्कूल मध्ये झाले त्या इयत्ता १० मध्ये त्यांना ८३ % मार्क्स  मिळाले होते.त्यांना एकूण ७ मामा त्या सर्व मामांचा लाडका भाचा म्हणजेच बाळकृष्ण होय गायकवाड मामांच्या आईचे वडील दिवंगत-- महादू रावजी मोकळ व आईची आई दिवंगत-पार्वताबाई महादु मोकळ आईचे आई - वडील हे बाळकृष्ण गायकवाड यांच्यावर खूप प्रेम करायाचे. त्यांचे संगोपन लाड कौतुकात केले. व चांगले संस्कार दिले. दहावी पास झाल्या नंतर बाळकृष्ण गायकवाड (मामा) हे वडाळा आनंद वाडी बरकतली अली दर्गा मार्ग पंचशील नगर येथे आई वडिल यांच्या कडे वडाळा मुंबई येथे  राहण्यास आले. व     इयत्ता ११वी चे ॲडमिशन आर्ट मधून सिध्दार्थ कॉलेज सी एस.टी  येथे घेतले व याच कॉलेजातून ते ग्रजुवट झाले बाळकृष्ण गायकवाड (मामा) यांची मातोश्री श्रीमती- शांताबाई आई या देखील जुनी ७ पर्यंत शिक्षण  घेऊन मुंबई सी एस टी स्टेशन जवळील काम हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होत्या, खरं तर त्यांना पोलिस मध्ये नोकरी मिळाली होती. परंतु ड्यूटी दिवस रात्र असल्या कारणाने त्याच्या आईने पोलीस ची  नोकरी स्वीकारली नाही. कारण त्यांच्या आई म्हणजेच दिवंगत-पार्वताबाई मामांची आजी यांच्या सांगण्यावरून मामांची आई शांताबाई यांनी कामा हॉस्पिटल येथीलच नोकरी स्वीकारली व 36 वर्षे शासकीय सेवा केली, तसेच बाळकृष्ण गायकवाड यांचे वडील आर. जे. गायकवाड (दादा) हे देखील पोस्ट अँड टेलिग्राम यामध्ये अधिकारी होते. तसेच त्या ठिकाणी ते ऑल इंडिया पोस्ट अँड टेलिग्राम युनियनमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून काम करायचे, त्या काळामध्ये (एस.ई.ओ.) हे पद आर. जे. गायकवाड (दादा) मामा चे वडील यांच्याकडे होते, त्यावेळेस अनेक लोक कागदपत्रांवर सत्यप्रत सह्या आणि राजमुद्रेचा स्टॅम्प घेण्यासाठी आर. जे.गायकवाड(दादा) यांच्याकडे येत असत. खरंतर आर.जे. गायकवाड हे त्याकाळी समाज कल्याण मंत्री 
मा. ना.रामदासजी आठवले (साहेब) यांच्यासोबत दलित पॅंथर संघटनेत काम करायचे आर. जे. गायकवाड (दादा) हे दलित पॅंथर चळवळीमध्ये सन्माननीय-- रामदासजी आठवले (साहेब) यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते व आठवले साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून आर. जे.गायकवाड म्हणजेच बाळकृष्ण गायकवाड (मामा) यांचे वडील यांनी दिवस-रात्र काम केले, हे सर्व काही बाळकडू वडिलांकडून बाळकृष्ण गायकवाड यांना मिळालेली एक देणगीच आहे, आजही वडाळा येथे आनंदवाडी पंचशील नगर या ठिकाणी आर.जे. गायकवाड(दादा) मार्ग हे नामकरण केलेलं आहे. आर. जे. गायकवाड हे आंबेडकरी चळवळीत मोठे नाव होऊन गेलेले आहे, आपल्या वडिलांचे नाव अजरामर करण्याचं काम बाळकृष्ण गायकवाड (मामा) करत आहेत. गायकवाड मामा यांचे लहान भाऊ मुंबई पोलीस क्राइम ब्रांच युनिट 4 अँटॉप हिल येथे सध्या ऑफिसर म्हणून काम करतात. त्याशिवाय बाळकृष्ण गायकवाड (मामा) यांनी सरकारी सात नोकऱ्या केल्या त्या मध्ये रेल्वे मध्ये दहा वर्ष त्यांनी नोकरी केली परंतु त्यांचे मन सरकारी नोकरीमध्ये रमले नाही, समाजसेवेची राजकारणाची प्रचंड आवड असल्यामुळे  त्यांनी नोकरी सोडून दिली आणि पूर्ण वेळ सामाजिक व राजकीय काम करत राहीले. त्यांची मोठी बहीण दिवंगत-- मीनाक्षी दिलीप भालेराव या वाशिंद तालुका -शहापूर जिल्हा- ठाणे येथे राहत होत्या तेथे बाळकृष्ण गायकवाड (मामा) आपल्या बहिणीकडे त्यांच्या पत्नी सौ. जयश्री सह वाशिंद येथे राहण्यास आले. नोकरी सोडून समाजकार्य करणे किती कठीण असतं त्यावेळेस वासिंद येथे आल्यानंतर  त्यांना जीवन जगताना पावलो पावली जाणं, बहिण मीनाक्षी व मेव्हणे दिलीप भालेराव यांच्या सहकार्याने वाशिंद येथे कसं तरी जम बसवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. तसेच मेहुणे दिलीप भालेराव यांचे मुळगाव-= म-हळ  तालुका - सिन्नर जिल्हा नासिक परंतु  उपजीविकेसाठी त्यांच्या आई-वडिलां च्या सह ते वासिंद  या ठिकाणी स्थायिक झाले होते.  थोरली बहीण व मेहुणे दिलीप भालेराव यांनी बाळकृष्ण गायकवाड (मामा) यांना खूप साथ दिली, परंतु गायकवाड मामा यांच्या रक्तातच , राजकारण समाजकारण असल्यामुळे त्यांना  वासिंद शहरांमध्ये शांत स्वस्त बसता येईना, त्यांनी आर.पी.आय.ची शाखा कुठे आहे याचा शोध घेतला. त्यानंतर त्यांची भेट त्या काळचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वासिंद विभागीय- अध्यक्ष - श्री. आत्माराम जी पगारे (साहेब)यांची भेट झाली. गायकवाड (मामा) यांनी श्री.आत्माराम पगारे(साहेब)यांना भेटून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश केला  व आर.पी.आय. पक्षाचे काम श्री. गायकवाड(मामा) यांनी सुरू केले. त्यांना कळले की वासिंद शहरांमध्ये आर.पी.आय. जिवंत ठेवली तर ती फक्त श्री. आत्मारामजी पगारे यांनीच ठेवली श्री. आत्मारामजी पगारे यांनी बाळकृष्ण गायकवाड (मामा) यांना वासिंद शहर उपाध्यक्ष हे पद दिले व दोघांनी मिळून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष वाढवण्याचे काम केले. पगारे आणि गायकवाड(मामा) यांनी सन्माननीय- रामदासजी आठवले साहेब यांचे हात बळकट करण्याचे व पक्षाला शहापूर तालुक्यात मोठं करण्यासाठी शंख फुंकले, यावेळेस पक्षावर आलेली संकट , सर्व झुगारून लावून , पक्षातर्फे गोरगरीब दलित आदिवासी, सामान्य नागरिक यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर बाळकृष्ण गायकवाड (मामा) यांना आत्माराम  पगारे यांनी वासिंद शहराध्यक्षपदी बसवले. व दिवस रात्र एकत्र करून पक्षाचे इमानदारीने काम करून  वासिंद ग्रामपंचायत मध्ये आपले उमेदवार निवडून आणले. गायकवाड (मामा) यांनी आर.पी.आय. पक्षाची ताकत वाढवण्याचे काम केले. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिली. जिल्हा संघटक सचिव हे पद त्यांना देण्यात आले. या पदाचा चांगला उपयोग करून त्यांनी दिवस-रात्र तरुणांच्या समस्या, बेरोजगारांच्या समस्या, महिला अत्याचार, भूमी पुत्र शेतकऱ्यांचे आंदोलन, तळगांतील शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या धनदागड्या लोकांनी घेतल्या त्या विविध ठिकाणी आंदोलन करून त्यांना परत करण्याचा प्रयत्नही केला. गोरगरीब जनतेचे पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील, शहरातील स्वच्छता असेल, नागरी समस्या असतील,  राष्ट्रीय कार्यक्रम असतील शहर विकास कामे असतील. बहुतांशी कामे बाळकृष्ण गायकवाड (मामा) यांनी केली. त्यानंतर त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना राज्य सचिव हे वरिष्ठांच्या आदेशानुसार, पद बहाल करण्यात आले. पक्षाची वाढ करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. त्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केले ते त्यांचे पहिले गुरु म्हणून उल्लेख करणे गरजेचे आहे, मुंबई वडाळा आनंद वाडी येथील त्यांचे पहिले राजकीय जीवनातले गुरु  आदरणीय- एन.एस.अहिरे (साहेब)  आता सध्या ते नवी मुंबई या ठिकाणी राहतात, अहिरे साहेबांनी बाळकृष्ण गायकवाड यांना गुरु मंत्र दिला  माणसं जोडायचे काम कर, माणसं तोडू नकोस,माणसं जोडल्यानेच माणूस मोठा होतो. हे त्यांच्या पहिल्या गुरूंनी दिलेल्या संदेशा ला आज गायकवाड (मामा) सफल झाले. त्यांचे दुसरे गुरु म्हणजे श्री.आत्मारामजी पगारे ज्यांनी बाळकृष्ण गायकवाड मामा यांना राजकारणात सक्रिय केलं. आणि गायकवाड (मामा) यांचे तिसरे गुरु म्हणजे आदरणीय- दयालजी बहादुरे (साहेब) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव या गुरूंमुळे गायकवाड (मामा) जोमाने काम करू लागले आहेत. दिवस रात्र पक्षाची धुरा सांभाळून नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये  आज ते उच्च पदावर काम करत आहे. इतकच काय तर त्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्र सांभाळत आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले, व चांगल्या हुद्द्यांवर त्यांना कामावर  लावले आहे. त्यांचा मोठा मुलगा- वैभव हा पडघा पोलीस स्टेशन येथे फॉरेन्सिक डिपार्टमेंटला ऑफिसर म्हणून आहे, व त्यांचा छोटा मुलगा- गौरव हा मर्चंट नेव्ही मध्ये ऑफिसर आहे, व त्यांची  पत्नी सौ.जयश्री बाळकृष्ण गायकवाड या महाराष्ट्र गृहरक्षक दल म्हणून सध्या सेवा करत आहेत. आज गायकवाड (मामा)यांनी स्वतःचा गायकवाड (मामा) हा ब्रँड बनवला आहे, त्यांना सर्व क्षेत्रातील लोक गायकवाड (मामा) म्हणूनच ओळखतात, सध्या वासिंद येथे त्यांचे स्वतःच्या मालकीचे 4 दुकानाचे गाळे आहेत, स्वतःचा ब्लॉक आहे, दोन फोर व्हीलर गाड्या आहेत. तीन टू व्हीलर आहेत. तसेच अडीअडचणीला लोकांना सहकार्य करणे लोकांच्या दुःखात धावून जाणे पोलीस स्टेशन ,मंत्रालय तहसील कचेरी, आदिवासी विकास प्रकल्प, शाळा कॉलेज यांच्या समस्या, सोडवण्यामध्ये गायकवाड (मामा) यांचा हात कुणी धरू शकणार नाही. म्हणूनच त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून मंत्रालय वार्ता प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मंत्रालय वार्ता साप्ताहिक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(साहेब) माजी केंद्रीय मंत्री आदरणीय- शरद पवार (साहेब) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय-- अनिल अहिरे(साहेब) यांच्या सहकार्याने आदरणीय- बाळकृष्ण गायकवाड (मामा) यांना समाज भूषण पुरस्काराने दि.26/8/2026 रोजी दुपारी 12-30 यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मंत्रालय जवळ, मुंबई येथे सन्मानित व गौरव येणार आहे. हीच त्यांच्या कार्याची मोठी पोचपावती आहे यात तीळ मात्र शंका नाही. आपल्या गौरव सोहळ्यानिमित्ताने आपणास लाख लाख मंगलमय शुभेच्छा.
 शुभेच्छुक-- सर्व मित्र परिवार.
जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय महाराष्ट्र.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

*शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार- सुभाष मोरे*

सीए परीक्षा में अनुष्का उमेश शुक्ला की शानदार सफलता