हिवताप निर्मुलन कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात लक्षवेध आक्रोश धरणे आंदोलन आयोजित करण्यात आला
हिवताप निर्मुलन कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात लक्षवेध आक्रोश धरणे आंदोलन आयोजित करण्यात आला
मुंबई
महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य शाखा ( र. न.२९३४/८४) यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ६ जुलै २०२६ रोजी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे लक्षवेध आक्रोश धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आज मुंबई व पुणे येथे अतिवृष्टी सुरू असल्यामुळे शासनाने रेड अलर्ट जारी केला. आपल्या मागण्यांबाबत पत्र क्र.१३४१० दिनांक ०६/०७/२०२६ नुसार शासन लवकरच निर्णय घेतील असे आश्वासन दिले.
सदर प्रसंगी प्रदीप चंदे, पुरुषोत्तम आडेप, सतीश कांबळे, दिपक गोतमारे, लक्ष्मण मराठे, संजय सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सदर आंदोलनास बृहन्मुंबई महानगरपालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती ( नि.) समितीतर्फे मुख्य सचिव श्री सुभाष मारुती अंकुश, सुबोध तांबे, जितेंद्र बोरीचा, पोपट अस्वारे उपस्थित होते.
समितीच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली गिल व सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला.
अतिवृष्टीमुळे त्यांना सदर आंदोलनास हजर राहता आले नाही. पुढील सर्व आंदोलनास आपल्या समितीचा पाठिंबा असल्याचे अध्यक्षा श्रीमती वैशाली गिल यांनी सांगितले.
Comments
Post a Comment