मुलुंडच्या आर. आर. कॉलेज मध्ये भव्य वृक्षारोपण
मुलुंडच्या आर. आर. कॉलेज मध्ये भव्य वृक्षारोपण
मुलुंड: मुलुंड पूर्व येथील सुप्रसिद्ध आर. आर. एज्युकेशनल ट्रस्ट द्वारे संचालित कॉलेज परिसरात, प्रणांकुर ट्रस्ट सोशल फाउंडेशन आणि आर. आर. एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने "विश्व पर्यावरण दिनाच्या पावन औचित्याने 5जुन, 2026 रोजी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या प्रसंगी ट्रस्ट चे चेयरमैन डॉ.राजेंद्र सिंह, विश्वस्त राजीव सिंह, अमित सिंह, पीयूष सिंह, पूरनमासी सिंह तसेच प्रणांकुर सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष शैलेश गायकवाड, जयप्रकाश ढेरे, प्रसाद इंदुलकर, बिलीमोरा मडम त्यांचे सहकारी सोबत होते.150 रोप लावण्यात आले.या प्रसंगी आर. आर. प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्या.अपूर्वा पवार ,इग्रेजी माध्यम च्या मुख्याध्यापिका लिशा आचार्य, माध्यमिक विभाग च्चा मुख्या.कीर्ती यादव तसेच शाळेच्या शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्तविक चंद्रवीर बंशीधर यादव, संचालन डॉ.प्रतिक धर्मशी आणि आभार शिक्षणतज्ञ महेंद्र सिंह यांनी केले.
Comments
Post a Comment