मधुकर घुमे यांच्या सेवानिवृत्तीला शेकडो हितचिंतक पोहोचले.

मधुकर घुमे यांच्या सेवानिवृत्तीला शेकडो हितचिंतक पोहोचले. 
मुंबई 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच-पश्चिम सर्वेलेंस विभागात कार्यरत असलेले ज्येष्ठ समाजसेवी,उत्कृष्ट कर्मचारी, म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबईचे सक्रिय पदाधिकारी आणि तक्रार निवारण समितीचे संघटक मधुकर घुमे हे ३५ वर्षांच्या सेवेनंतर या महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत.सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेले उत्कृष्ट कर्मचारी मधुकर घुमे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात युनियनच्या सर्व अधिकाऱ्यांसह महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व प्रभागातील कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा व अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समारंभात एच पश्चिम विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यासह कवी,पत्रकार व तक्रार निवारण समितीचे सरचिटणीस विनय शर्मा दीप, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष भालचंद्र वाणी,यूनियनचे संघटक प्रवीण कदम,दिनेश छौकर,तेजस नांदिवडेकर,तुषार लाड,किरण भेरे,अभय हुकेरी, सन्नी सकपाळ,गिरीश गुंजीकर, रितेश कांबळे,सुमेध कांबले,रहमान गीरकर उपस्थित होते.शेवटी मधुकर घुमे यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

*शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार- सुभाष मोरे*

सीए परीक्षा में अनुष्का उमेश शुक्ला की शानदार सफलता