शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
मुंबई : आज दिनांक 28 मार्च, 2025 रोजी गुरू तेगबहादुर नगर येथील क. दा गायकवाड मुंबई पब्लिक स्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरणाचा शानदार सोहळा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे कनिष्ठ पर्यवेक्षक, शारीरिक शिक्षण विभाग मधुकर माळी सर उपस्थित होते. तसेच पाहुणे राजेश बारी सर, राजेंद्र चौधरी सर, निलिमा चौधरी मॅडम, उज्वला बनकर मॅडम, वीणा पाटील मॅडम, शशिकला निकम मॅडम, स्मिता कोळी मॅडम, विमला यादव मॅडम, अनुसूया कट्टा मॅडम, मुख्याध्यापक उषा पथनवार मॅडम ,मधुबाला धमीर मॅडम ,जसिंथा मेरी मॅडम, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने नंतर विद्यार्थ्यांनी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. नृत्य, नाटक, गायन आणि विविध कला सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला, ज्यामध्ये विविध शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.राजेंद्र चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत म्हटले की, "शिक्षणासोबतच कला, क्रीडा आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे."समारंभाचे यशस्वी आयोजक शाळेचे मुख्याध्यापक विष्णू सातपुते सर यांनी शिक्षक, कर्मचारी आणि पालकांचे आभार मानले. सूत्रसंचालन राजेश अवघडे सर, आभार प्रदर्शन नामदेव धनकुटे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. हा सोहळा उपस्थित सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.
Comments
Post a Comment