माझा संकल्प मस्क्युलर डिस्ट्रॉफी मुक्तीचा असोसीएशन ह्या संस्थेच्या माध्यमातून दिनांक - २३/०३/२०२५ रोजी रविवारी

माझा संकल्प मस्क्युलर डिस्ट्रॉफी मुक्तीचा असोसीएशन 
ह्या संस्थेच्या माध्यमातून दिनांक - २३/०३/२०२५ रोजी रविवारी
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील दिव्यांग मुलांना मोफत इलेक्ट्रिक व्हील चेअर वितरण करण्यात आली... 
मस्क्युलर डिस्ट्रॉफी ह्या आजाराने ग्रस्त असलेली मुले, जी चालू शकत नाही ,उठू अथवा बसू शकत नाही.... जी कित्तेक वर्षे फक्त एकाच जागेवर बसून असतात... पण आज त्यांना जणू पाय मिळाले आहेत. ह्या इलेक्ट्रिक व्हील चेअर मिळालाने आज ते त्यावर बसून बाहेर आनंदने फिरत आहेत....शाळेत जात आहेत... मित्रांसोबत खेळत आहेत.. त्या मुलांचा आनंद गगनात मावेना... एकूण २० मुलांना ५५ ते ६० हजार रुपये किंमत असलेली इलेक्ट्रिक व्हील चेअर मोफत वितरण करून नशिबाने विस्थापित झालेल्या मुलांच्या आयुष्याला प्रस्थापित करण्याचा कार्य Brenntag Ingredients (India) Private Limited ह्यांच्या आर्थिक सहकाऱ्याने, सदर संस्थेने केले आहे.
ह्या संस्थेचे सन्मानीत 
अध्यक्ष -- श्री डॉ. मंगेश पेडामकर 
उपाध्यक्ष -- श्री भरत पाटील 
सरचिटणीस -- सौ. पल्लवी देशपांडे 
कोषाध्यक्ष -- श्री सुरेश घारे 
चिटणीस -- सौ. अर्चना गिरी 
सल्लागार -- श्री अजित सिन्हा श्री गणेश पवार श्री सागर जाधव श्रीमती. डॉ शुभांगिनी नलावडे 
व सर्व कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी व सभासद 
ह्यांच्या अमोघ कार्याला कोटी कोटी सलाम...

Comments

Popular posts from this blog

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगितीशिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती