स. गो.बर्वेनगर शाळेत संविधान दिवस साजरा.
मुंबई: घाटकोपर पश्चिम येथील मुंबई महानगर पालिकेच्या स. गो.बर्वेनगर माध्यमिक शाळेत आज संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक अंबरसिंग मगर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय संविधान या विषयावर शालेय विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त भाषणे झाली. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक, आणि संविधान अभ्यासक पांडुरंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि गरज याबाबतीत विस्तृत माहिती सांगितली. नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांची जाणिव करून दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी सुभाष रजक, अशोक शेंडे, रवि पाटील, यादवराव राठोड, दिलिप भाटे, सचिन कांबळे, पूर्वा लोटणकर, अनुपमा वाघ, विमल आवताडे, अर्चना कदम यांनी आपापल्या वर्गात संविधान आणि लोकशाही या विषयावर विविध उपक्रम राबविले.
Comments
Post a Comment