बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमिक शाळांच्या कुस्ती स्पर्धा वर्षानगर मनपा शाळा विक्रोळी येथे संपन्न
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमिक शाळांच्या कुस्ती स्पर्धा वर्षानगर मनपा शाळा विक्रोळी येथे संपन्न
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांच्या कुस्ती स्पर्धांचे आयोजन दिनांक 25 ते 26 सप्टेंबर या कालावधीत वर्षानगर शाळेत संपन्न झाल्या. प्रथम या स्पर्धांचे आयोजन 23/09/2024रोजी तीन परिमंडलात करण्यात आले होते. स्पर्धेत 17वर्ष वयोगटात मुलगे 7वजनी गट व मुलींचे 5वयोगट होते. परिमंडळात प्रत्येक वजनी गटातील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकने विजयी झालेले 84मुलगे व 60मुली अंतिम स्पर्धेत सहभागी झाले.या स्पर्धेचे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार विजेते आनंदा गायकवाड यांचे हस्ते झाले.या वेळी सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव आणि महापौर पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक भाऊ साहेब आहेर उपस्थित होते. स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभास उपशिक्षणाधिकारी किर्ती वर्धन किरतकुडवे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी केले. अतिथींच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना मेडल,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महापालिकेचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात ,उपक्रमांत सहभागी होतात यश मिळवतात. मनपाचे शिक्षक खऱ्या अर्थाने मनपाच्या विद्यार्थांच्या प्रगतीसाठी मेहनत घेतात.मुंबई मनपाचे खेळाडु जिल्हा राज्य,राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल यश संपादित करीत आहेत .याबद्दल मनपाच्या शा शि शिक्षकांच त्यंनी कौतुक केलं.विजयी विदयार्थांच अभिनंदन केलं .विज्ञान व तंत्रज्ञाच्य जगात खेळांच महत्त्व अधिकच वाढलं आहे नव्हे आवश्यक आहे.शरीर स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने किमान एक खेळ खेळावा असे मनोगत सांगितले. कार्यक्रमास पर्यवेक्षक दत्तु लवटे व सर्व कनिष्ठ उपस्थित होते. या स्पर्धा मुंबई उपनगर तालिम संघाचे सरचिटणीस सतीश कदम व त्यांच्या सहकार्याने पार पडल्या. कुस्ती स्पर्धा प्रमुख कनिष्ठ पर्यवेक्षक अण्णासो बागल होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वनाथ गढरी यांनी केले तर आभार प्रदर्शन कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी यांनी केले .राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment