शिक्षण सप्ताह अंतर्गत वृक्ष संवर्धन

शिक्षण सप्ताह अंतर्गत वृक्ष संवर्धन
 मुंबई:म.न.पा.माध्यमिक शाळेत शिक्षण सप्ताह  अंतर्गत  दिवस 6 वा,वृक्षसंवर्धन ,झाडे लावून आजचा शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला.प्रसंगी विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेवून झाडे लावली.तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची शपथ घेतली.आपल्या जीवनात वृक्षांना अनन्य साधारण असे महत्व आहे.वृक्षांचे घटत जाणारे प्रमाण जागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरत आहे.त्यातूनच निसर्गाचे चक्र बदलत जात आहे.काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळ या मागची कारणे पण वृक्षांचे कमी होत जाणारे प्रमाण कारणीभूत आहे.त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी दर वर्षी किमान 10 झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प आजच्या दिवशी केला.व त्याची कार्यवाही आज शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करून सदर उपक्रमांचा शुभारंभ केला. सदर उपक्रमात शाळेचे प्रभारी  मुख्याध्यापक श्री. काशिपुरी गोसावी,सहकारी शिक्षिका श्रीम.कल्पना जाधव मॅडम, श्रीम.स्नेहा भोसले मॅडम, श्रीम.पूजा चव्हाण मॅडम व शाळेचे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला.सदर उपक्रमासाठी विभाग निरीक्षक श्रीम.सुनिता खाडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

समाजसेवी शिक्षाविद् मयाशरण सिंह की सुपुत्री शालिनी सिंह का नितीन सिंह के साथ पाणिग्रहण संस्कार संपन्न

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग के आदर्श व्यक्तित्व उपेंद्र राय के कृतित्व को सलाम।

पूर्व विधायक नरेंद्र मेहता को लगा जोर का झटकाबेहिसाबी संपत्ति मामले की जाँच रद्द करने से कोर्ट का इंकार