दहावीत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी थोपटली पाठ**बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील यशवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचे महानगरपालिका मुख्यालयात पुष्पगुच्छ देवून उंचावले मनोबल*

*दहावीत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी थोपटली पाठ*
*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील यशवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचे महानगरपालिका मुख्यालयात पुष्पगुच्छ देवून उंचावले मनोबल*
दहावीच्या परिक्षेत मिळालेले गुण पुढील शैक्षणिक प्रवासासाठी खूप प्रेरणादायी असतात. या टप्प्यावर उंचावलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर अधिक जोमाने अभ्यास करून महाविद्यालयीन जीवनातही प्रगती करा, अशा शब्दात बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दहावीत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च 2024 मध्ये घेतलेल्या एसएससी परीक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 248 माध्यमिक शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी आज (दिनांक 29 मे 2024) पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. 

यावेळी सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय)  चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (शिक्षण) श्रीमती चंदा जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी उपस्थित होते.

अतिरिक्त महानगरपालिक आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, यापुढचा शैक्षणिक टप्पा आव्हानात्मक आहे. दहावीनंतर कोणतीही विद्या शाखा निवडा. अभ्यास करत सतत पुढे जा. उप आयुक्त (शिक्षण) श्रीमती चंदा जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

यशवंत विद्यार्थ्यांमध्ये आयुष जाधव (97.8 टक्के, कुलाबा महानगपालिका शाळा), वरुण चौरसिया (97.2 टक्के, खेरवाडी मुंबई पब्लिक स्कूल), आदित्य वानखेडे (96 टक्के, खेरवाडी मुंबई पब्लिक स्कूल), गौरी नेरकर (95.2 टक्के, गोरेगाव ट्रान्झिट कॅम्प मुंबई पब्लिक स्कूल), शगुन पटवा (95.2 टक्के, नेहरूनगर कांजूर मुंबई पब्लिक स्कूल), वेदांत सावंत (94.6, ग्लोब मिल मुंबई पब्लिक स्कूल), धनश्री बोधू (94.6 टक्के, सायन कोळीवाडा मुंबई पब्लिक स्कूल) यांचा समावेश होता. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आयुक्त भूषण गगराणी यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यंदा 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 16 हजार 140 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 14 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सरासरी निकाल 91.56 टक्के इतका लागला आहे. तसेच महानगरपालिकेच्या 79 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न