आदर्श आचारसंहिता असतानाही नवी मुंबई महानगरपालिकेत 50 कोटींच्या कामाचे वाटपवादग्रस्त संजय देसाई यांनी सेवानिवृत्त आधी केला पराक्रम

आदर्श आचारसंहिता असतानाही नवी मुंबई महानगरपालिकेत 50 कोटींच्या कामाचे वाटप
वादग्रस्त संजय देसाई यांनी सेवानिवृत्त आधी केला पराक्रम

संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असुनही नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता संजय देसाई यांनी 50 कोटींची निविदा उघडण्याचे धाडस दाखविले. नवी मुंबई महानगरपालिकेत 50 कोटींच्या कामाचे वाटप करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी निवडणूक आयोगाकडे करत निविदा रद्द करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ठाणे लोकसभेच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ आणि नवी मुंबई पालिका आयुक्त यांस केलेल्या तक्रारीत अनिल गलगली यांचे म्हणणे आहे की संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असुनही नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता श्री संजय देसाई यांनी 50 कोटींची निविदा उघडण्याचे धाडस दाखविले. अंदाजपणाने हे काम परत एकदा अश्विनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीस मिळालं आहे. संजय देसाई यांनी एका विशिष्ट कंपनीस केलेली उघड मदत आणि आचारसंहितेचे केलेले उल्लंघन लक्षात घेणे आवश्यक आहे. 4 जून 2024 नंतरही ही निविदा उघडली जाऊ शकली असती पण देसाई हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनी आचारसंहिता आणि नियमाचे उल्लंघन करत काम बहाल केल्याची तक्रार गलगली यांची आहे.

मागील कित्येक वर्षांपासून प्रभारी शहर अभियंता पदांवर आरूढ संजय देसाई यांची निवडणूक पूर्वी बदली का करण्यात आली नाही? याबाबत शासन आणि आयुक्तांकडे  गलगली यांनी यापूर्वी लेखी तक्रार केली होती. निविदा 29 मे 2024 रोजी उघडण्याचे प्रयोजन काय आहे? याबाबत निवडणूक आयोगाची परवानगी संजय देसाई यांनी घेतली आहे का? सेवानिवृत्त होण्याआधी घाईघाईने निविदा उघडुन विशिष्ट कंपनीवर मेहरबानी करण्याची आवश्यकता काय आहे? असे प्रश्न विचारत संजय देसाई यांनी निवडणूक दरम्यान आदर्श आचारसंहिता धुडकावून केलेल्या अन्य कामांची माहिती मागवून कार्यवाही करणे. याच प्रकारे अजून किती निविदा उघडण्यात आले आणि किती बिल देण्यात आले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी गलगली यांची आहे.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न