संस्थापटलावर 31 वर्ष अढळस्थान निर्माण करणारा *ध्रुवतारा*

संस्थापटलावर 31 वर्ष अढळस्थान निर्माण करणारा *ध्रुवतारा*
व्ही .एन. नाईक शिक्षण संस्था म्हटली की ,प्रकर्षाने एक चेहरा समोर येतो. तो म्हणजे आदरणीय भाऊसाहेब सांगळे यांचा. आपल्या कर्तव्य निष्ठेने व स्वभावाने संस्थापटलावर 31 वर्ष अढळस्थान निर्माण करणारा हा *ध्रुवतारा* असेच त्यांना म्हणावेसे वाटते. चेहऱ्यावरील स्मित हास्य कामाप्रतीची निष्ठा, कमालीचा संयम ,संघर्षातून तावून सुलाखून निघालेले व्यक्तिमत्व, जे मिळाले त्याबद्दल परमेश्वराचे सदैव आभार मानणारी कृतज्ञता, कुटुंबवत्सल, समाधानी, मितभाषी, आपल्या सकारात्मक शैलीतून समोरच्या व्यक्तीशी संवाद साधणारे व त्याचे दुःख हालके करून, पाठबळ देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊसाहेब जी सांगळे. पैशाने नाही पण मनाने श्रीमंत असणारा हा माणूस. घरी आलेल्या व्यक्तींचे तोंड भरून आदरातिथ्य करणारा ,हा संयमी माणूस.
अतिशय मधाळवाणी !कुणाशीही संवाद साधताना बोला ताई !बोला दादा !असे आदर देऊन बोलणार.
भाऊसाहेबांच्या ठाई कामाबद्दलची प्रचंड निष्ठा दिसून येते. संस्थानिष्ठा ,कर्तव्यनिष्ठा हे तत्व त्यांनी आपल्या सेवेत 31 वर्ष अविरतपणे अंगीकारले. संस्थेला ,संस्थेतील कामाला त्यांनी आपल्या माउली समान महत्व दिले. आपले कर्तव्य अतिशय मनापासून तत्परतेने निष्ठेने पूर्ण केले. म्हणून तर संस्थेतील कर्मचारी ,शिक्षक वृंद सर्व पदाधिकारी यांच्या हृदयात त्यांनी मानाचे अढळस्थान मिळविले. सर्वांनी त्यांच्यावर कमालीचा विश्वास ठेवला. त्यांच्या प्रति सर्वांना असलेला हा विश्वास ,हीच तर त्यांच्या कामाची खरी पावती व त्यांना मिळालेला पुरस्कार होय. प्रामाणिक व पारदर्शकपणे काम हे त्यांचे तत्व !पावलोपावली निदर्शनास येते. 
अतिशय कुटुंब वत्सल असलेले ,आदरणीय भाऊसाहेब आपल्या मुलांबरोबरच इतर नातेवाईकांना देखील शिक्षणाबाबतीत मदत करताना दिसून येतात. त्यांना शिक्षणासाठी आपल्या घरी ठेवून मार्गदर्शन करतात .त्यांच्या अडचणी दूर करतात. मन मोठ असलं की सर्वांना सामावून घेता येत .हे त्यांच्यापासून शिकायला मिळते.या वेळी शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ हरी काकड आणि सौ.संगीता रामभाऊ काकड यांनी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न