दहिसर मुंबई येथे भरुचा रोड मनपा माध्यमिक शाळेत मराठी राजभाषा दिवस साजरा*

*दहिसर मुंबई येथे भरुचा रोड मनपा माध्यमिक शाळेत मराठी राजभाषा दिवस साजरा*
मुंबई: भरूचा रोड म.न.पा.माध्यमिक मराठी शाळेत सुनिता खाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.प्रसंगी मनपा माध्यमिक विभागाच्या अधीक्षक आरती खैर मॅडम, निरीक्षिक शाळा सुनिता खाडे मॅडम तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक कार्यक्रमाला उपस्थित होते.स्वतः आरती खैर मॅडम यांनी देखील या प्रसंगी मराठी गीत गायन केले तसेच सुनिता खाडे मॅडम यांनी देखील कविता वाचन केले. अनेक मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या शिक्षकांनी काव्य वाचन करून आजचा कार्यक्रम यशस्वी केला.त्यात आकर्षण म्हणजे सागर पवार सरांनी गायन केलेले गीत, तसेच सिद्धार्थ मगर सर,रोहन सर,श्रीराम सर,यांनी आपल्या स्वरचित कविता सादरीकरण केले तर संगीता नाथजोगी मॅडम यांनी गीत गायन केले व शोभा जगताप मॅडम यांनी कविता वाचन केले. इयत्ता दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनी देखील स्वलिखित कविता वाचन केले तसेच अंबरसिंग मगर सर व इतर मुख्याध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व कार्यक्रमाचे सुंदर असे निवेदन श्रीम.पूजा चव्हाण मॅडम व संजय आंधळे सर यांनी केले. एकंदरीत सुनिता खाडे मॅडम निरीक्षक शाळा यांच्या संकल्पनेनुसार आपला आजचा मराठी राजभाषा गौरव दिवस उत्साहात व जल्लोषात  यशस्वीपणे साजरा करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भरुचा रोड मराठी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोसावी सर व सहकारी शिक्षक पूजा मॅडम, स्नेहा मॅडम, व कल्पना मॅडम यांनी सुनिता खाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार केले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती