अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जातीदोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती "

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत संगत 
दोन दिसांची नाती "
      आज दिनांक २७ सप्टेंबर २०२२ सार्वजनिक आरोग्य खाते जी / दक्षिण विभागातील सं.नी. निरीक्षक विवेक मदन माधव यांचा निरोप समारंभ यशस्वीरित्या हिंदवीर सेवा संघ सभागृहात पार पडला. अतिशय मेहनत,सचोटी,संयम,अन् प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी म्हणून त्यांचा सार्वजनिक आरोग्य खात्यात नावलौकिक आहे.त्यांच्या मनपा च्या कारकिर्दीतील परिचयाच्या सर्व उपस्थितांनी आणि त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी या सोहळ्याचे आयोजन करणारे सर्वेलन्स विभाग जी/ दक्षिण यांचे सर्व कर्मचारी तसेच किट नियंत्रण अधिकारी यांचा सर्व कर्मचारी वृंद सोबत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्योत चव्हाण सर डॉ. अमोल सर डॉ. मयूर सर डॉ. प्रियांका आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल धुरी सर,चारुशीला कुबल. S I एफ दक्षिण,शारदा परदेशी. A N M  प्रभादेवी स्वास्थ्य केंद्र,अमोल कांबळे. J o.  p c o जी दक्षिण,रामदास दाते रिटायर्ड  surv insp एफ दक्षिण,प्रभाकर पवार. स्वेच्छा निवृत्ती ( राजीनामा)  surv insp.एफ दक्षिण यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते.बृ.मु.म.न.पा.तील एक बहुआयामी व्यक्तिमत्व स्वच्छता निरीक्षक प्रदीप सावंत यांनी मैत्रीच्या कंगोऱ्यातून गायन रुपी श्री.माधव यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी विनयदीप शर्मा आणि यांनी जीवनात शृंगार रसाला किती महत्त्व आहे हे आपल्या मुक्तछंदातून ऐकवले. तर निवृत्ती पश्चात मी काय करेन. हे आपल्या कवितेतून सत्कारमूर्ती विवेक माधव यांनी स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उन्मेष कामतेकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती