*टोळी निघाली गोविंदांची, फोडायाला दहीहंडी!*
*टोळी निघाली गोविंदांची, फोडायाला दहीहंडी!* भारतीय संस्कृतीतून आपण सण काढून टाकू शकणार नाही! प्रत्येक सणामागे आहे सांस्कृतिक महत्त्व, काही कथा, काही रूढी आणिक बरंच काही! कृष्ण म्हणजे माखनचोराशी निगडितही बऱ्याच गोष्टी आहेत! नटखट श्रीकृष्ण दही चोरून खायचा! त्याच्या तावडीतून शिंकाळ्यातलं ना दही वाचायचं ना लोणी वाचायचं! त्या रम्य दिवसांची आठवण करून देतो दहीहंडीचा उत्सव! पूर्वीची साधी, सोपी, सरळ, हवीहवीशी दहीहंडी आज 'इव्हेंट' बनली आहे! प्रारंभी पुरुषांसाठी मर्यादित असलेली दहीहंडी आता स्त्रियांसाठीही झाली आहे! ही दहीहंडी उंच उंच होत गेली! दहीहंडी फोडणारे गोविंदाही थरावर थर, उंच उंच थर लावत जातात! दहीहंडी फोडायचा अनेक दिवस ते सराव करत असतात! आयुष्यात प्रयत्न करणं, पडणं, पुन्हा उभं राहणं, पुन्हा प्रयत्न करणं आणि यश मिळवणं हे चालूच असतं! या मध्ये अडथळे हे असतातच, दहीहंडी ही केवळ दह्याचीच नसते तर ती पैशांचीच असते! दहीहंडीची रक्कम वाढत जात आहे! रक्कम जेवढी मोठी तेवढी दहीहंडी प्रतिष्ठेची, असं समजलं जातं! गोविं...