*ज्ञानोत्तुंग!*
*ज्ञानोत्तुंग!*
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सोनं होतं!
या सोन्याला तावून-सुलाखून निघावं लागलं!
हे सोनं अगदी अस्सल शंभर नंबरी होतं!
त्यांची ज्ञान शक्ती अगदी अद्भुत होती!
ते मानवी होते यावर अजूनही विश्वास बसत नाही!
ते ज्ञानसागरात पोहणारे ज्ञानहंस होते!
त्या ज्ञानसूर्याला आमच्या पूर्वजांनी ओळखलं नाही!....
युगायुगातून अवतार घेणारी ती ज्ञान माउली होती!
ज्ञानाची अमूल्य मालिका हातचं राखून न ठेवता त्यांनी आम्हाला दिली आहे!
ज्ञानदेवांनी आमच्या नयनात ज्ञानांजन घातलं आहे, त्यामुळे आजही चकित व्हायला होतं!
ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतील ज्ञानाचा संचलु आजही आश्चर्यचकित करतो!
ज्ञानदेवांचं समस्त साहित्य ज्ञान साहित्यच आहे!
एक लोकोत्तर ज्ञानी पुरुष आपल्या भारतात जन्मला हे खरंच आपलं भाग्य आहे!
नितांत सोशिक, कमालीचा शांतपणा, अनंत यातना सहन कर्ता असा हा ज्ञानवृक्ष होता!
ज्ञानदान संपल्यावर त्यांनी या जगात राहायचं नाकारलं!
ज्ञानेश्वर हे महाज्ञानपीठ होते हेच खरं!
संत ज्ञानेश्वरांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
रचयिता:© रवींद्र काळे
सोम२६०८२०२४
९८३३७७०७३९
*(या रचनेचे सर्वाधिकार _रचयिता © रवींद्र काळे_ यांच्या कडेच आहेत.रचना पुढे पाठवायची असल्यास ती रचयित्याच्या नावासहितच पुढे पाठवावी.रचयित्याचे नाव काढून नुसती रचना,तसेच रचयित्याचे नाव काढून, स्वतःचे नाव टाकून रचना पुढे पाठवू नये.)*
रचना कालावधी:सु.५० मिनिटे.
छायाचित्रे सौजन्य: गूगल
Comments
Post a Comment