*शीर्षक:- स्त्री*
*शीर्षक:- स्त्री*
स्त्री म्हणजे अंगणातील
प्राजक्ताचा सडा
स्त्री म्हणजे पवित्र असा
अमृताच्या घडा..!!१!!
स्त्री म्हणजे पावसाताल
सप्तरंगी इंद्रधनू
कृष्णाने वाजवलेली
सुमधुर अशी वेणू...!!२!!
स्त्री म्हणजे कातरवेळचा
देव्हारातील मिणमिणता दिवा
स्त्री म्हणजे पुजेतला
प्रसादातील तिर्थाचा गोडवा!!३!!
खरं तर तिच्याशिवाय
पान ही हलत नाही
संसाराच कोणताच सुख
तिच्या शिवाय फुलत नाही.!!४!!
ती नसेल घरात तर
महाल ही सूना आहे
गृहलक्ष्मी तिचं घरची
तिच्यामुळे घराला शोभा आहे.!!५!!
तुम्ही येता लाडात
नी घेता तिला कुशीत
तिचं मात्र सारं लक्ष
गॅसवर ठेवलेल्या भाजीत..!!६!!
घराची पवित्रता तिचं तर राखते
काय कुठे ठेवलय तिचं सांगते
तुम्ही केलेला पसारा तिचं सावरते
मग केली थोडी चिडचिड
तर का बरं सर्वांना खुपते..!!७!!
थोड जरा तिला
मनाप्रमाणे जगू द्या
आयुष्याचा आनंद
हवा तसा लुटू द्या...!!८!!
✍️ *सौ शोभा प्रवीण गायकवाड*
*कल्याण (पश्चिम)*
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मध्य मुंबई विभाग अध्यक्षा
Comments
Post a Comment