वरिष्ठ शिक्षक ओमप्रकाश गुप्ता यांचा भव्य सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न.
वरिष्ठ शिक्षक ओमप्रकाश गुप्ता यांचा भव्य सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न.
मुंबई : भांडुप (पश्चिम) स्टेशन रोड येथील गीता हॉल मध्ये सुभाष नगर मनपा हिंदी शाळेतील विद्वान, कर्तृत्ववान आणि आदर्श वरिष्ठ शिक्षक ओमप्रकाश महावीर गुप्ता यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भव्य व संस्मरणीय सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे सातशे शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र व विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी त्यांच्या अर्धांगिनी सौ.निर्मलादेवी ओमप्रकाश गुप्ता यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. मंत्रोच्चार आणि शंखनादाच्या मंगलमय वातावरणात दोघांनी एकमेकांना पुष्पहार अर्पण केले व केक कापून हा सोहळा अधिक अविस्मरणीय केला.
उपस्थित मान्यवरांनी श्रीयुत गुप्ता सरांच्या यशस्वी कार्यात सौ. गुप्ता यांच्या मोलाच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
मनपा शाळांचे माजी अधीक्षरामचंद्र आर. पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून वार्ड क्र. ११४ च्या नवनिर्वाचित नगरसेविका तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (उपनगर) व न्याय-विधी समितीच्या सदस्या राजुलताई संजय पाटील , माजी उपशिक्षणाधिकारी चंद्रकेश आय. सिंह (सी.के. सिंह), माउंट मेरी इंग्लिश हायस्कूलचे चेअरमन धनंजय टी. सिंह, प्रभारी विभाग निरीक्षिका कल्याणी नखाते, मनपा शिक्षक सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष ओमप्रताप जे. सिंह, विद्यमान उपाध्यक्ष राजपती आर. प्रजापती, शिक्षक सभेचे सहसचिव तसेच वारकरी संप्रदायाचे प्रचारक रामराव व्ही. पांगरेकर, नितीन ढालपे, मनपा शिक्षक बँकेचे संचालक एम. केवट, वासुदेव मेश्राम, राष्ट्रीय साहू तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुरारी गुप्ता, शिक्षणतज्ज्ञ रामसकल सिंह, गिरधर यादव,प्रदीप सिंह, तेजबहादूर सिंह, रविंद्र सिंह, विनोद द्विवेदी, आद्याप्रसाद सिंह (ए.पी. सिंह), हरीश विशे,तसेच स्कूल इस द बेस्ट स्कूल इन मुंबई(“BMC School is the Best School in Mumbai”) चे जनक सोसलिस्ट शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव, समाजसेवक विष्णु परब , राजेश बालन आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख वक्ते म्हणून माजी मुख्याध्यापक रामसकल सिंह , शाळेचे माजी मुख्याध्यापक गिरधर यादव यांनी गुप्ता सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हृदयस्पर्शी शब्दांत वर्णन केले.सत्कारमूर्ती ओमप्रकाश गुप्ता यांनीही आपल्या मनोगतात सर्व अधिकारी, सहकारी आणि विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या भगवंतभजनाने सभागृहाला भक्तिरसात रंगवून टाकले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आदर्श मंच संचालक आणि शिक्षणतज्ञ अवधेशनारायण आर. गिरी यांनी केले. मानपत्राचे वाचन राज प्रजापती यांनी केले, तर आभार प्रदर्शन ओमप्रताप सिंह यांनी व्यक्त केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी जलपान व प्रीतिभोजनाचा आस्वाद घेतला.
विद्यालय परिवाराच्या मुख्याध्यापिका कल्याणी नखाते व आयोजन समितीतील शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. शिक्षक व गीतकार संजय यादव यांनी सादर केलेल्या फगुआ गीताने उपस्थितांना भावविभोर केले. आदर्श शिक्षक दिनेशप्रताप सिंह व इंद्रलाल यादव यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या समारंभास एस वार्डसह विविध वार्डांतील मनपा तसेच खासगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये शिक्षणतज्ज्ञ विनयकुमार सिंह, मायाशरण सिंह, विद्या नरेंद्र सिंह, राजकुमार तिवारी, मनोज यादव, नागेंद्र यादव, सरिता तिवारी, सुमित्रा यादव, अमरनाथ सिंह, ऊषा वर्मा, दिलीप राय, प्रदीप यादव, मुन्ना सिंह, बिपीनकुमार पांडेय, मुकेश सिंह, ईश्वर निंबार्क, मुकेश अंबादे, रामलाल राम, सुनीता गिरी, दीना यादव, विजेंद्र सिंह आदींसह सत्कारमूर्तींचे कुटुंबीय, नातेवाईक आणि समाजबांधव उपस्थित होते.
सत्कारमूर्तींच्या संस्कारांनी घडलेल्या त्यांच्या कन्या व सुपुत्रांनी उपस्थित सर्व पाहुण्यांना प्रेमपूर्वक भेटवस्तू देत मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
उल्लेखनीय म्हणजे, ओमप्रकाश गुप्ता यांनी शिक्षण क्षेत्रात तब्बल *३३ वर्षे २ महिने ७ दिवस* अविरत सेवा बजावून दिनांक १ मार्च २०२६ रोजी सन्मानाने सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या या प्रदीर्घ व समर्पित सेवेला उपस्थितांनी मनःपूर्वक अभिवादन केले.
Comments
Post a Comment