*शिक्षक भारती संघटनेच्या पाठपुराव्याला यश**अल्पसंख्याक शाळांतील NO WORK NO PAY निर्णय अखेर मागे*

*शिक्षक भारती संघटनेच्या पाठपुराव्याला यश*
*अल्पसंख्याक शाळांतील NO WORK NO PAY निर्णय अखेर मागे*
अल्पसंख्याक शाळातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 13 जुलै 2016 रोजी शासन निर्णय निर्गमित करून नो वर्क नो पे धोरण लागू करण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून अल्पसंख्यांक शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचे समायोजन होईपर्यंत वेतन मिळत नव्हते. यासंदर्भात शिक्षक भारती संघटना सातत्याने आवाज उठवत होती. तसेच मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करत होती. शिक्षक भारती संघटनेच्या वतीने केलेल्या पाठपुराव्यानुसार शिक्षण विभागाने 30 जानेवारी 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करून नो वर्क नो पे चे धोरण मागे घेतलेले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नो वर्क नो पे धोरण मागे घेतल्यामुळे अतिरिक्त ठरल्यानंतरही अल्पसंख्याक शाळातील शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमितपणे वेतन मिळणार आहे, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष 
सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क 
सुभाष सावित्री किसन मोरे 
9137654689

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न