बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती
मुंबई:गुरूतेग बहादुर नगर सायन कोळीवाडा येथील महानगरपालिकेच्या कदा गायकवाड मराठी शाळेतील शिक्षिका श्रीमती निलिमा विलास चौधरी या एक ऑगस्ट 2024 पासून स्वेच्छा निवृत्ती घेत आहेत.
         यानिमित्त शाळेच्या सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची वैशिष्ट्य असे की बहुसंख्य माजी विद्यार्थी कार्यक्रमासाठी हजर होते. 
       प्रमुख पाहुणे म्हणून  सन्माननीय प्रशासकीय अधिकारी श्री. किसन पावडे साहेब सन्माननीय कनिष्ठ पर्यवेक्षक श्री. मधुकर माळी साहेब, सन्माननीय विभाग निरीक्षिका श्रीमती पूजा पाटील मॅडम उपस्थित होत्या.अध्यक्षस्थान सन्माननीय मुख्याध्यापक श्री. सातपुते सर यांनी भूषविले.
        श्रीमती निलिमा चौधरी, या एक आदर्श शिक्षिका होत्या. मुलांच्या भाव विश्वाशी रममाण होऊन  मुलांच्या भावभावना जाणून घेऊन, त्यांच्या गरजा जाणून घेऊन,  विद्यार्थ्यांची सुप्त गुण  ओळखून त्यानुसार विद्यार्थ्याला घडवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असे. आणि म्हणूनच त्यांचे काही विद्यार्थी फोटोग्राफर आहेत, काही इंजिनियर आहेत, काही बँकेत उच्च पदावर आहेत, एमबीए झालेले आहेत, आणि विशेष म्हणजे हे विद्यार्थी हजर होते.विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडताना विशेष करून महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षणाचे जे बाळकडू मिळाले त्यावर आमच्या पुढील जीवनाची दिशा ठरली. इतर अनेक संस्थाच्या, सीबीएससीच्या  शाळा आहेत पण महानगरपालिकेच्या शाळेचे वैशिष्ट्य सर्वांनी अधोरेखित केले. 
      कु. रेशमा पठाण हिने महानगरपालिकेच्या शाळेचे आभार मानले. आणि बाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ती आज कोटक महिंद्रा बँकेत सीनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
      रूपाली ही TV9 साठी रिपोर्टर म्हणून काम करते व स्वतः हे एक tution class  चालवते. तिने तिच्या बोलण्याच्या शैलीचे पूर्ण श्रेय श्री चौधरी मॅडम यांना दिले.
      अमीषा, प्रणाली आणि दिव्या यांनी चौधरी मॅडम यांनी  शाळेत  उपक्रम घेतले , त्यांचा त्यांच्या प्रगतीसाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी कसा हातभार लागला हे  सांगितले.
      वैष्णव भागडे हा विद्यार्थी serviceberry technologies मध्ये service Now developer म्हणून कार्यरत आहे. राजेश जाधव याने  इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये  इंजीनियरिंग करून मुंबई महानगरपालिकेत नोकरीला आहे.
 योगेश घाटे या विद्यार्थ्याने फायनान्स मध्ये एमबीए करून एल पी एल फायनान्शिअल सर्विसेस पुणे मध्ये नोकरी करत आहे. अक्षय या विद्यार्थ्याने  media influencer आणि you tuber म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. असे विद्यार्थी महापालिकेने घडवले याचा सार्थ अभिमान महापालिकेला आहे.
       प्रमुख पाहुणे सन्माननीय किसन पावडे साहेब यांनी चौधरी मॅडम यांनी  उत्तम सेवा केली, आत्मिक समाधानासाठी त्यांनी काम केले. आणि ज्याला थांबायचे कळले त्याला आयुष्य जगायचे कळले  अशा शब्दात त्यांनी त्यांचे  कौतुक करून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. 
      सन्माननीय कनिष्ठ पर्यवेक्षक श्री माळी साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या रूपाने त्यांना महासन्मान  मिळाला आहे त्यांचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये होता. विद्यार्थी हे त्यांचे दैवत होते. त्यांच्यामध्ये मला बहिणाबाईंच्या प्रेमळपणाचे  प्रतिबिंब दिसते अशी उपमा देऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या.
      सन्माननीय अध्यक्ष श्री सातपुते सर यांनी अनेक शाळा आजूबाजूला असूनही महापालिकेची शाळा टिकवून ठेवणे हे चौधरी बाईंसारख्या गुणवंत शिक्षकांमुळे शक्य होते. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल जीवे भावे, भक्ताला जसा  पांडुरंगच सगळीकडे दिसतो. तसा त्यांना सर्वदूर विद्यार्थी दिसत असे, असे गौरव उद्गार काढून त्यांनी मॅडमला शुभेच्छा दिल्या.
     श्रीमती साधना कामेर  यांनी त्यांचे अध्यापन, त्यांनी विद्यार्थ्यांच्या  शिक्षणासाठी केलेली आर्थिक मदत याबाबत उल्लेख करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
     श्रीमती वीणा  पाटील यांनी त्यांच्या अभ्यासुवृत्तीचे कौतुक केले व त्यांनी दासबोधाचा अभ्यास चालू ठेवावा असे सांगून शुभेच्छा दिल्या. 
     श्रीमती रेखा गायकवाड यांनी, ‘एक चांगली मैत्रीण कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे निलिमा ‘  ‘निलिमा म्हणजे उत्तम गुणांचा समुच्चय ‘ असे गौरवोदगार काढून शुभेच्छा दिल्या
      श्री बेडेकर सर यांनी शालेय कामात कुठलीही कुचराई न करता सेवा पूर्ण केली अशा आशय पर कविता सादर करून शुभेच्छा दिल्या. 
      श्रीमती तनुजा आचार्य यांनी त्यांचे अध्यापन, तंत्र कौशल्य, सहकार्य वृत्ती आणि त्या सेवानिवृत्त होत आहेत याबद्दल खंत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. 
     श्रीम. सुर्वे मॅडम यांनी निलिमा म्हणजे निस्वार्थी मन,  मितभाषी,  माणुसकी जपणारी,  नम्रतेने बोलणारी असं व्यक्तिमत्व  असे सांगून शुभेच्छा दिल्या.
        श्रीम. उमा भालेराव यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन, प्रसंगी  त्यांच्या पालकांपर्यंत जाऊन त्या समस्या सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी असे म्हणून शुभेच्छा दिल्या.
       श्रीम. मधुरा बागवे यांनी,  प्रेमळ हळुवार नातं जपणारी,  मुलांच्या विश्वात रमणारी, सर्वांना मार्गदर्शन करणारी असे सांगून शुभेच्छा दिल्या.
        श्री प्रकाश चौधरी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पण काम केले असे सांगून शुभेच्छा दिल्या.
       श्रीमती माधुरी पाटील  या त्यांच्या कॉलेजच्या मैत्रीण, त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देऊन तेव्हापासून त्या कशा हुशार , मनमिळाऊ आणि  सहकार्य वृत्तीच्या होत्या ते सांगून शुभेच्छा दिल्या.
       त्यांचे बंधू सन्माननीय प्राचार्य SSR College of Pharmacy, Silwasa यांनी त्यांच्या आयुष्यातील मोठ्या बहिणीचे स्थान महत्वाचे आहे,  हे सांगून शुभेच्छा दिल्या.
      त्यांच्या विहीणबाई श्रीमती वृषाली वर्षेकर यांनी त्यांचा ज्ञानाचा दिवा  सतत तेवत ठेवावा असे सांगून आयुष्याचा भरपूर आनंद घ्या.  इथे तुमच्या वरील प्रेमाचा महापूर मला सर्वांच्या बोलण्यातून दिसून येतोय असे सांगून शुभेच्छा दिल्या.
      श्रीमती मेधा कुलकर्णी यांनी त्यांची गुणवर्णन करणारी कविता वाचन करून शुभेच्छा दिल्या.
 त्यांच्या जाऊ बाई श्रीमती ज्योती चौधरी यांनी त्या माझ्या जाऊ नसून माझ्यावर बहिणीसारखी माया करतात असे सांगून शुभेच्छा दिल्या. 
      त्यांचे पती श्री विलास चौधरी यांनी त्यांच्या राहिलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण सहकार्य करेल असे सांगून शुभेच्छा दिल्या.
       शिक्षक सेनेचे खंदे कार्यकर्ते श्री धुरी सर यांनी त्या सर्वगुणसंपन्न असे सांगून शुभेच्छा दिल्या.
 श्रीमती  पवार बाईंनी मानपत्राचे वाचन करून त्यांच्या कार्याचा एकूण लेखाजोखा सांगून त्यांना मानपत्र देऊन गौरवले. 
.
         कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला कु. आशी विपश्यना रंजनकुमार या चिमुकलीने आपल्या अत्यंत गोड आणि मधुर स्वरात “आता विसाव्याचे क्षण” व   “गुरुने दिला ज्ञानरूपी वसा” अशी  दोन गाणी सादर करून सर्व सभेचे मन जिंकून घेतले.
        या हिऱ्याला पैलू पाडणारे संगीत शिक्षक श्री बागुल सर यांचे विशेष अभिनंदन.
सत्कारमूर्ती श्रीमती निलिमा चौधरी, सर्व विद्यार्थी, मान्यवर  आणि सहकारी यांचे भाषण ऐकून भारावून गेल्या. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना त्यांना क्षणभर आपला निर्णय चुकला की काय? अशा मनस्थितीत  त्या अत्यंत भावूक  झाल्या. सर्वांचे आभार त्यांनी मानले आणि सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
      हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय छान  झाला आणि याचे संपूर्ण श्रेय जाते ते, श्री राजेश अवघडे  सर आणि श्री महेश बागुल सर यांना.
       अतिशय उत्कृष्ट आणि ओघवती  रसाळ वाणी,  ठिकठिकाणी शायरीची पेरणी, मध्येच समयानुरूप गाण्याच्या ओळी, अतिशय बहारदार असे निवेदन श्री राजेश अवघडे सर यांनी केले., श्री महेश बागुल सर यांनी ईशस्तवन,  स्वागत गीत आणि कु. आशी विपश्यना रंजनकुमार हिची  दोन्ही गाणी बसवून ती सादर केली.
       तसेच  शाळेतील सहकारी शिक्षक   कामेर मॅडम ,   पवार मॅडम ,  विमल मॅडम, माधुरी मॅडम, शमीम मॅडम, चंद्रभागा मॅडम, सुवर्णा मॅडम आणि शाळेतील शिपाई श्रीमती सुनिता कांबळे.
 या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.
      श्री अजय जाधव, वरूण व इतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले. 
 सर्व कार्यक्रमासाठी सन्माननीय  मुख्याध्यापक श्री सातपुते सर यांचे मार्गदर्शन अनमोल होते.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड में सार्वजनिक नवकुंडीय हवनात्मक चंडी महायज्ञ संपन्नकार्यक्रम में भारी संख्या में शामिल हुए गणमान्य

यादव संघ प्रगति पैनल को भारी समर्थन