सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन 
ठाणे 
डोंबिवली पश्चिम येथील जय अंजनी दर्शन सहकारी संस्थेच्या प्रांगणात शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला सत्यनारायण कथा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीच्या अधिका-यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेकडो भाविकांनी महाप्रसाद घेतला व त्यानंतर गीत-संगीताचा आस्वाद घेतला. कवी आणि पत्रकार विनय शर्मा दीप यांनी सांगितले की, दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन दिनेश शांताराम पाटील सेक्रेटरी सौ. शरयू शरद भोसले,ट्रेझरर किशोर खळे यांच्या मार्गदर्शना खाली. सांस्कृतिक कार्यक्रम व विविध खेळ यांच्या आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात नंबर गेमची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये पाच जणांनी बाजी मारली. हिमांशू शिवचरण यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आले.सोसायटी कमिटी व कार्यकर्ता अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न