विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन थांबवल्याने शिक्षक भारती संघटनेचा आंदोलनाचा इशारा.
विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन थांबवल्याने शिक्षक भारती संघटनेचा आंदोलनाचा इशारा.
मुंबईतील विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याचे वेतन कोणतेही शासनाचे लेखी आदेश नसताना दिव्यांग कल्याण मंत्रालय अंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मुंबई शहर व उपनगर श्री रविकिरण पाटील यांनी मनमानी पद्धतीने थांबविण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यांमुळे विशेष शाळांत अस्वस्थतेचे वातावरण आहे. पगार रखडल्याने अनेक शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. इतर जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार नियमित असून केवळ मुंबईत कारवाई झाल्याने नाराजी तीव्र होत आहे, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिली.
पटनिर्धारणनुसार शिक्षक अतिरिक्त करण्याची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. शाळा संहितेनुसार अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन समायोजन होईपर्यंत वेतन मूळ शाळेतून सुरू ठेवण्याची तरतूद आहे. असे असताना वेतन बंद करण्यात आल्याने घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षकांची मोठी कसरत सुरू आहे.
*तीन महिने पगार रखडल्याने आंदोलनाचा इशारा!*
कोणताही शासन निर्णय नसताना शिक्षकांचे तीन महिने वेतन थांबविणे अन्यायकारक आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून पगार सुरू करावा. अन्यथा आंदोलनांचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर शिक्षक भारतीने आयुक्त दिव्यांग कल्याण यांना पत्र पाठवून या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क :सुभाष सावित्री किसन मो.नं.9137654689
Comments
Post a Comment